भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीमुळे झारखंड राज्य क्रिकेटच्या नकाशावर आले. २००० साली बिहारपासून वेगळे होऊन झारखंड हे राज्य उदयास आले. त्यानंतर २००४ ला झारखंडने रणजी ट्रॉफीमध्ये पदार्पण केले.
२०१०-११ च्या मोसमात त्यांनी विजय हजारे ट्रॉफीचे विजेतेपदही मिळवले. या राज्यातून धोनीसह अन्य काही क्रिकेटपटूंनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करण्याचाही मान मिळवला.
भारताचे प्रतिनिधित्व करण्याचा मान मिळालेले ३ झारखंडचे क्रिकेटपटू –
१. एमएस धोनी –
एकेकाळी भारतीय रेल्वेमध्ये टिकीट कलेक्टर म्हणून काम करणारा यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनीने २००४ ला भारतीय संघाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि झारखंडला क्रिकेटच्या नकाशावर आणले. त्याच्या पुढच्याच वर्षी त्याने १४८ धावांची आणि नाबाद १८३ धावांची तुफानी खेळी करत त्याची दखल घ्यायला लावली.
पुढे धोनीने भारतीय संघाच्या नतृत्वाची जबाबदारीही हाती घेतली. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने २००७ चा पहिला टी२० विश्वचषक, २०११ चा वनडे विश्वचषक आणि २०१३ ची चॅम्पियन्स ट्रॉफी या ३ मोठ्या आयसीसीच्या स्पर्धा जिंकल्या. तो आयसीसीच्या ३ वेगवेगळ्या स्पर्धा जिंकणारा पहिला कर्णधार आहे.
त्याच्या नेतृत्वाखाली भारताने जसे मोठे विजय मिळवले तसेच २०११-१२ च्या मोसमात इंग्लंड, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात मोठे पराभवही पाहिले. धोनीने डिसेंबर २०१४ ला कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. तसेच नंतर त्याने २०१७ ला मर्यादीत षटकांचे कर्णधारपदही सोडले. धोनीने भारताकडून २०१९ च्या विश्वचषकात शेवटचा सामना खेळला आहे. सध्या तो आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार आहे.
२. वरुण ऍरॉन –
झारखंडचे नेतृत्व केलेला वरुण ऍरॉनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २०११ च्या वेस्ट इंडिज दौऱ्यात पदार्पण केले. त्याचे पदार्पणात त्याने ३ विकेट्स घेत सर्वांना प्रभावित केले होत. परंतू कामगिरीत सातत्य नसल्याने आणि सततच्या दुखापतींमुळे त्याला भारतीय संघातून बाहेर रहावे लागले.
त्याने भारताकडून शेवटचे २०१५ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध बंगळुरु कसोटीत खेळला. त्याने भारताचे ९ कसोटी आणि ९ वनडेमध्ये प्रतिनिधित्व केले आहे. यामध्ये त्याने कसोटीत १८ आणि वनडेत ११ विकेट्स घेतल्या आहेत.
तसेच त्याने ६३ प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये खेळताना १६७ विकेट्स घेतल्या आहेत.
३. सौरभ तिवारी –
डावखूरा फलंदाज सौरभ तिवारीने भारताकडून ३ वनडे सामने खेळले आहेत. त्याने २०१०ला ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात विशाखापट्टणम येथे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. पहिल्या सामन्यात तो १२ धावांवर नाबाद राहिला. त्यानंतर तो त्याचवर्षी न्यूझीलंड विरुद्ध शेवटचा वनडे सामना खेळला.
तिवारी २००८ ला विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली १९ वर्षांखालील विश्वचषकाचे विजेतेपद मिळवलेल्या भारतीय संघाचाही भाग होता. त्याने आत्तापर्यंत १०० प्रथम श्रेणीचे सामने खेळले असून त्यात त्याने १९ शतके आणि २८ अर्धशतकांसह ४७.१२ च्या सरासरीने ६९७५ धावा केल्या आहेत.
ट्रेंडिंग घडामोडी –
३ महान क्रिकेटपटू व त्यांचे अपयशी ठरलेले पुत्र
उपेक्षितांचा हिरो लुटेरु राॅस पोट्युआ लोटे टेलर
भारतीय मुलींशी लग्न करणारे परदेशातील ६ क्रिकेटपटू