आयपीएलला जगातील सर्वात लोकप्रिय टी-२० लीग मानले जाते. या स्पर्धेत भारतातील आणि विदेशातील अनेक खेळाडूंना खेळताना पाहिले गेले आहे. देशातील युवा खेळाडूंना आयपीएलच्या माध्यमातून त्यांच्या उत्कृष्ट खेळीचे प्रदर्शन करण्यासाठी संधी मिळते. तसेच या स्पर्धेत अनेक दिग्गजही खेळताना दिसतात. अनेक दिग्गज असे आहेत ज्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे, पण आयपीएमध्ये ते अजूनही खेळतात. यामागचे कारण आयपीएमध्ये सन्मान, लोकप्रियता आणि पैसा या सर्व गोष्टी मोठ्या प्रमाणात मिळतात.
भारतीय संघातील अनेक दिग्गजांनी आतापर्यंत आयपीएमध्ये चांगली कामगिरी केली आहे. अनेकांनी आयपीएलच्या २० षटकांच्या सामन्यात शतकी खेळीही केली आहे तर, काहींनी गोलंदाजीमध्ये चांगले प्रदर्श केले आहे. मात्र, यामध्ये काही दिग्गज असेही आहेत, जे या स्पर्धेत त्यांची कमाल दाखवू शकले नाहीत. या लेखात आपण त्यापैकीच तीन दिग्गजांची माहिती घेणार आहोत.
आयपीएलमध्ये अपयशी ठरलेले तीन भारतीय दिग्गज
सौरव गांगुली
भारतीय संघाचे माजी कर्णधार सौरव गांगुली भारतीय क्रिकेटमधील किती मोठे नाव आहे, हे सांगण्याची गरज नाही. मात्र, ते आयपीएलमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटप्रमाणे कामगिरी करू शकले नाहीत. आयपीएल कारकिर्दीत त्यांनी एकूण ५९ सामने खेळले असून १३४९ धावा केल्या आहेत. गांगुली यांचा आयपीएलमधील स्ट्राइक रेट १०६ होता. आयपीएलमधील त्यांचे हे प्रदर्शन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील प्रदर्शनाच्या तुलनेत फारच सामान्य आहे.
वसीम जाफर
देशांतर्गत क्रिकेटमध्ये भारतातील सर्वात मोठे खेळाडू मानले जाणारे वसीम जाफर आयपीएलमध्ये काही खास प्रदर्शन करू शकले नाहीत. वसीम यांनी त्यांच्या संपूर्ण आयपीएल कारकिर्दीत केवळ ८ सामने खेळले आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय संघासाठी दुहेरी शतक करणाऱ्या वसीमची आयपीएलमधील कारकीर्द आणखीन पुढे जायला हवी होती, पण त्यांच्या मंद गतीच्या फलंदाजीमुळे ते जास्त काळ आयपीएलमध्ये खेळू शकले नाहीत
चेतेश्वर पुजारा
भारताच्या कसोटी संघाचा नियमीत सदस्य चेतेश्वर पुजाराला आयपीएलमध्ये खेळण्याची जास्त संधी मिळाली नाही. त्याने खेळलेल्या आयपीएलमधील ३० सामन्यांमध्ये ३९० धावा केल्या आहेत. जागतिक क्रिकेटमध्ये दिग्गज कसोटी फलंदाज म्हणून ओळखला जाणारा पुजारा टी२० क्रिकेटमध्ये काही खास कमाल करू शकला नाही. आयपीएलमध्ये त्याच्याकडून चांगल्या प्रदर्शनाची आशा केली गेली होती, पण तो या अपेक्षा पूर्ण करू शकला नाही. तो सध्या चेन्नई सुपर किंग्ज संघाचा सदस्य आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
वॉर्नरचे सनरायझर्स सोबतचे दिवस संपले का? खुद्द संघ प्रशिक्षकांनी दिले महत्त्वपूर्ण प्रश्नाचे उत्तर
इंजमाम-उल-हक यांना हृदयविकाराचा झटका, सचिन तेंडुलकरकडून लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा
श्रीसंत म्हणाला, ‘त्यावेळी २ लाखांची साधी पार्टी करायचो, मग मी १० लाखांसाठी स्पॉट फिक्सिंग का करू?’