भारतीय संघ नेहमीपासूनच आपल्या धडाकेबाज फलंदाजांसाठी ओळखला जातो. भारतीय फलंदाजांनी जवळपास तिन्ही क्रिकेट प्रकारामध्ये अधिकतर विक्रम केले आहेत. कदाचित याच कारणामुळे जागतिक क्रिकेटमध्ये भारतीय संघाने एक वेगळे स्थान मिळविले आहे. भारतीय संघाच्या दिग्गज खेळाडूंबद्दल जेव्हाही चर्चा होते, तेव्हा सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड यांसारख्या खेळाडूंची नावे डोळ्यासमोर चटकन येतात.
भारतीय संघाच्या अनेक खेळाडूंनी वनडे क्रिकेटची सुरुवात उत्कृष्ट पद्धतीने करत आपल्या नावाचा डंका वाजवला. विराट कोहली आणि शिखर धवन या खेळाडूंच्या नावावर वनडेत भारताकडून सर्वात वेगवान एक हजार धावा करण्याचा विक्रम आहे. दोघांनीही २४ डावांमध्ये हा कारनामा केला आहे.
भारतीय संघात असे अनेक खेळाडू होऊन गेले, ज्यांनी पदार्पणानंतर चांगली कामगिरी करत धावा केल्या होत्या. अनेक नावे असेही होते, जे दीर्घ काळापर्यंत संघात राहिले आणि काही असेही होते ज्यांना नियमित संघाचा भाग होण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागली.
या लेखात आपण त्या ३ भारतीय खेळाडूंबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांनी त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या १५ वनडे सामन्यात सर्वाधिक धावा केल्या आहेत.
सुरुवातीच्या १५ वनडे सामन्यात सर्वाधिक धावा करणारे ३ भारतीय फलंदाज- 3 Indian Batsman with Most Runs in their Initial 15 ODI
३. विराट कोहली
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) वनडे क्रिकेटच्या सुरुवातीला चमकदार कामगिरी केली होती, ती आताही सुरुच आहे. सुरुवातीच्या १५ वनडे सामन्यात विराटने ५८४ धावा केल्या होत्या. या यादीत तो तिसऱ्या स्थानी आहे. विराटने २००८मध्ये डंबुला येथे श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यातून वनडे पदार्पण केले होते.
२. नवज्योत सिंग सिद्धू
वनडेत सुरुवातीच्या १५ सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांमध्ये नवज्योत सिंग सिद्धू यांचा दुसरा क्रमांक लागतो. त्यांनी कारकिर्दीच्या पहिल्या १५ वनडे सामन्यांनंतर तब्बल ६५८ धावा केल्या होत्या. सिद्धू यांनी १९८७ मध्ये चेन्नई येथे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यातून वनडेत पदार्पण केले होते.
१. श्रेयस अय्यर
भारतीय संघाचा फलंदाज श्रेयस अय्यरने (Shreyas Iyer) सर्वांना आश्चर्यचकित करत सुरुवातीच्या १५ वनडे सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय खेळाडूंमध्ये पहिला क्रमांक पटकाविला आहे. मधल्या फळीत खेळताना त्याने त्याच्या पहिल्या १५ वनडे सामन्यात ६८६ धावा केल्या आहेत. त्याने २०१७मध्ये धरमशाला येथे श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यातून वनडेत पदार्पण केले होते. मागील काही काळापासून तो उत्कृष्ट कामगिरी करत आहे.
वाचनीय लेख-
-आपल्या सेंड ऑफ सामन्यात अवघ्या जगाला रडवणारे ५ दिग्गज क्रिकेटपटू; दोन नावे आहेत भारतीय
-२० जून का आहे भारतीय क्रिकेटसाठी सर्वात खास? घ्या जाणून
-जेव्हा १७ वर्षांपुर्वी दु:खात आख्खा देश झाला होता लाॅकडाऊन