जगातील सर्व टी20 लीगमधील सर्वात मोठी लीग म्हणजेच इंडियन प्रीमियर लीग. या लीगची सुरुवात २००८मध्ये झाली होती. तेव्हापासून ते २०१९ पर्यंत आयपीएलचे १२ हंगाम पूर्ण झाले आहेत. आयपीएल २०२० कोरोना व्हायरसमुळे संयुक्त अरब अमिरातीमध्ये १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर २०२० या काळात होत आहे.
आयपीएलमध्ये जरी २० षटकांचे सामने होत असतील. तरी फलंदाज फटकेबाजी करण्याची संधी मात्र सोडत नाहीत. साधारणत आयपीएलमध्ये १०० सामने खेळणाऱ्या फलंदाजांनी त्यांच्या कारकिर्दीत एक तरी शतक मारलेले असते. मात्र, असेही काही फलंदाज आहेत, ज्यांनी त्यांच्या आयपीएल कारकिर्दीत १७० पेक्षा जास्त सामने खेळूनही एकही शतक मारलेले नाही.
तर जाणून घेऊयात, आयपीएलमध्ये १७० पेक्षा जास्त सामने खेळून एकही शतक न मारणारे ३ भारतीय खेळाडू 3 Indian Players Cant Do Atleast 1 Century Instead Played More Than 170 IPl Matches
१. एमएस धोनी
चेन्नई सुपर किंग्स संघाचा यशस्वी कर्णधार एमएस धोनीने २००८पासून आयपीएलमध्ये एकूण १९० सामने खेळले आहेत. यात त्याने १३७.८५च्या स्ट्राईक रेटने ४४३२ धावा केल्या आहेत. यात त्याच्या २३ अर्धशतकांचा समावेश आहे. मात्र, धोनीला आतापर्यंत एकही शतक मारता आलेले नाही. धोनीने २०१९मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्ध सर्वाधिक ८४ धावा केल्या होत्या.
२. रॉबिन उथप्पा
रॉबिन उथप्पा आयपीएलच्या पहिल्या हंगामापासून क्रिकेट खेळत आहे. तो मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, पुणे वॉरियर्स आणि केलकाता नाईट रायडर्सकडून खेळला आहे. उथप्पाने आतापर्यंत १७७ सामन्यात २८.८३च्या सरसरीने ४४११ धावा केल्या आहेत. यात त्याच्या २४ अर्धशतकांचा समावेश आहे. मात्र त्याने आतापर्यंत सर्वाधिक ८७ धावा केल्या आहेत. त्याला एकही शतक ठोकला आलेले नाही.
३. दिनेश कार्तिक
गेल्या दोन हंगामापासून दिनेश कार्तिक कोलकाता नाईट रायडर्स संघाचे नेतृत्त्व करत आहे. आतापर्यंत आयपीएलच्या ६ संघांकडून खेळलेल्या कार्तिकने सलामीपासून ते ६व्या क्रमांकापर्यंत फलंदाजी केली आहे. त्याने एकूण १८२ सामन्यात २७.०६च्या सरासरीने ३६५४ धावा केल्या आहेत. यात त्याच्या १८ अर्धशतकांचा समावेश आहे. कार्तिकचे आयपीएलमधील शतक फक्त ३ धावांनी हुकले होते. त्याच्या आयपीएलमधील सर्वाधिक धावा या ९७ इतक्या आहेत.
याबरोबर १०० पेक्षा जास्त सामने खेळून शतक करता न आलेले फलंदाज
रविंद्र जडेजा (१७०), शिखर धवन (१५९), गौतम गंभीर (१५४), केराॅन पोलार्ड (१४८), पार्थिव पटेल (१३९), ड्वेन ब्राव्हो (१३४) व युवराज सिंग (१३२) यांचा समावेश होतो.
ट्रेंडिंग लेख-
संघाला विश्वचषक जिंकून देऊन निवृत्ती घेतलेले ५ खेळाडू, एक आहे भारतीय
२०११च्या विश्वचषकानंतर कारकिर्द संपुष्टात आलेले ३ भारतीय क्रिकेटर
‘फलंदाज’ म्हणून गोलंदाजांनी केले ‘हे’ ५ जागतिक विक्रम; भारताचा खेळाडूही यादीत