कोरोना व्हायरस बाधीतांची संख्या भारतात आजच ८०० झाली आहे. केंद्र सरकार व राज्य शासन सर्व प्रकारचे प्रयत्न करुन बाधीतांचा आकडा कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहे. गेल्या २ आठवड्यात या आजाराने १९ जणांना भारतात आपले प्राण गमवावे लागले आहे.
महाराष्ट्रातही बाधीतांचा आकडा १६२ असून ४ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहे. अशा परिस्थितीत गेले दोन आठवडे देश व जगातील खेळांच्या सर्व स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत. ऑलिंपिक्ससारखी मानाची मोठी स्पर्धा १ वर्षासाठी पुढे ढकलण्यात आली आहे. भारतीय क्रिकेट बोर्डानेही १५ एप्रिलपर्यंत इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल पुढे ढकलली आहे.
सद्य परिस्थिती पाहता आयपीएलचे आयोजन एप्रिल महिन्यात तरी नक्कीच कठीण दिसत आहे. अशा परिस्थितीत ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात टी२० विश्वचषकाचे ऑस्ट्रेलियात आयोजन करण्यात आले आहे. काही खेळाडूंनी आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी केली तर त्यांचे ऑस्ट्रेलियाचे तिकीट पक्के होऊ शकते. परंतु जर आयपीएल झाली नाही तर या खेळाडूंचा विश्वचषकाचा पत्ताही कट होऊ शकतो. (3 Indian players who might not get into T20 World Cup squad if IPL 2020 is cancelled.)
३. संजू सॅमसन-
२५ वर्षीय संजू सॅमसनला भारतीय संघात म्हणावी अशी संधी आजपर्यंत मिळाली नाही. सॅमसनने भारताकडून ४ टी२० सामने सामने खेळले आहेत. २०१५मध्ये एक तर जानेवारी व फेब्रुवारी २०२०मध्ये तीन असे एकूण ४ सामने हा खेळाडू खेळला आहे. न्यूझीलंड दौऱ्यावर टी२० संघात निवड झालेल्या सॅमसनने दोन सामन्यात मिळून जेमतेम २५ धावा केल्या आहेत. त्यामुळे आयपीएल २०२०कडे तो एक विश्वचषकात स्थान मिळण्याची संधी म्हणून पाहत असणार.
२. शिवम दुबे
भारतीय संघात हार्दिक पंड्याची जागा घेणारा खेळाडू म्हणून शिवम दुबेकडे पाहिले जात आहे. परंतु त्याने अजून एकदाही तशी कामगिरी केलेली नाही. शिवम भारताकडून १ वनडे व १३ टी२० सामने खेळला आहे. या मुंबईकर खेळाडूने आजपर्यंत वनडेत ९ तर टी२०मध्ये ५४ धावा केल्या आहेत. गोलंदाजीतही १३ सामन्यात केवळ ५ विकेट्स त्याने घेतल्या आहेत. एक स्फोटक फलंदाज म्हणून दुबेकडे पाहिले जाते. जर आयपीएल २०२०मध्ये झाली नाही तर शिवमचे विश्वचषकाचे स्वप्न भंग पावु शकते.
१. एमएस धोनी
भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीने भारताला २००७चा विश्वचषक जिंकून देताना नेतृत्त्वाची धुरा समर्थपणे सांभाळली होती. आज याच धोनीला भारतीय टी२० संघात स्थान मिळविण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागणार आहे. धोनी शेवटचा सामना कधी खेळला हे आता आठवावे लागते. ९ जुलै २०१९ रोजी हा खेळाडू शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला आहे. धोनीने दोन आठवड्यांपुर्वीच आयपीएलची जोरदार तयारी सुरु केली होती. त्यामुळे तोही या स्पर्धेकडे ऑस्ट्रेलियाला जाण्याचे तिकीट म्हणूनच पाहत असणार.
ट्रेडिंग घडामोडी –
एकाच दिवशी पदार्पण केलेल्या जोड्या, एकाने केले पुढे मोठे नाव तर दुसरा राहिला खूपच मागे
चौथ्या क्रमांकासाठी भारताकडे आहेत तब्बल १२ पर्याय उपलब्ध, ३ नावं आहेत मराठी
आयपीएलमध्ये चेन्नईला हा संघ कायमच नडतो, तब्बल १७ पराभव आलेत सीएसकेच्या नशीबात