आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेला प्रारंभ झाला आहे. भारतीय संघाचा पहिला सामना २४ ऑक्टोबर रोजी पाकिस्तान संघाविरुद्ध होणार आहे. या हाय व्होल्टेज सामन्यापूर्वी भारतीय संघाला इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध सराव सामने खेळायचे आहेत. भारतीय संघाचा पहिला सराव सामना १८ ऑक्टोबर रोजी इंग्लंड संघाविरुद्ध पार पडणार आहे. या संघात असे काही खेळाडू आहेत, जे सराव सामन्यात चांगली कामगिरी करून पाकिस्तान संघाविरुद्ध होणाऱ्या सामन्यातील अंतिम ११ खेळाडूंमध्ये स्थान मिळवू शकतात.
१) भुवनेश्वर कुमार –
https://www.instagram.com/p/CM_SV4Lg1wM/?utm_medium=copy_link
भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारच्या फॉर्मवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. परंतु त्याच्याकडे भरपूर अनुभव आहे. त्यामुळे तो सराव सामन्यात चांगली कामगिरी करण्याच्या प्रयत्नात असणार आहे. भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीबद्दल बोलायचं झालं तर तो चेंडू स्विंग करू शकतो. तसेच शेवटच्या षटकांमध्ये देखील चांगली गोलंदाजी करू शकतो. त्याने जर इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध होणाऱ्या सराव सामन्यात अप्रतिम कामगिरी केली तर त्याला नक्कीच प्लेइंग ईलेव्हनमध्ये स्थान दिले जाऊ शकते.
२) आर अश्विन –
https://www.instagram.com/p/CVIEroJMDNp/?utm_medium=copy_link
आर अश्विनचे तब्बल ४ वर्षानंतर टी-२० संघात पुनरागमन झाले आहे. परंतु नुकताच संपन्न झालेल्या आयपीएल २०२१ स्पर्धेत त्याला साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले होते. त्यामुळे त्याच्याकडे जरी अनुभव असला तरीदेखील त्याला अंतिम प्लेइंग ईलेव्हनमध्ये स्थान मिळणे कठीण दिसून येत आहे. त्यामुळे आर अश्विनला जर भारतीय संघाच्या प्लेइंग ईलेव्हनमध्ये स्थान मिळवायचे असेल तर नक्कीच त्याला सराव सामन्यात चांगली गोलंदाजी करून गडी बाद करावे लागणार आहेत.
३) ईशान किशन –
https://www.instagram.com/p/CSluPM4JOH9/?utm_medium=copy_link
भारतीय संघाचा युवा यष्टिरक्षक फलंदाज ईशान किशन हा आपल्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो. त्याला आयपीएल २०२१ स्पर्धेत साजेशी कामगिरी करता आली नव्हती. परंतु शेवटच्या सामन्यात त्याने डावाची सुरुवात करताना तुफान फटकेबाजी केली होती. सध्या त्याला सलामीवीर फलंदाज म्हणून संघात स्थान मिळणे कठीण आहे. त्यामुळे ईशान किशनला इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध होणाऱ्या सराव सामन्यात मध्यक्रमात येऊन तुफान फटकेबाजी करावी लागणार आहे. कारण ईशान किशनने जर मध्यक्रमात आक्रमक फलंदाजी केली तर भारतीय संघाला मोठी धावसंख्या उभारण्यात मदत होऊ शकते.
महत्त्वाच्या बातम्या-
शाकिबचा टी२० विश्वचषकात ‘वर्ल्ड रेकॉर्ड’, मलिंगाला ओव्हरटेक करत बनला सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज
टी २० विश्वचषकाच्या पहिल्याच दिवशी धक्कादायक निकालाची नोंद, बांगलादेश स्कॉटलंडकडून पराभूत
टी२० विश्वचषकाच्या पहिल्याच सामन्यात ओमानचा मोठा विजय; पीएनजीला १० विकेट्सने केलं पराभूत