---Advertisement---

ASIA CUP: निवड होऊनही ‘या’ तीन भारतीय खेळाडूंना बसावं लागणार बाकावर! वाचा काय आहे कारण

On: बुधवार, ऑगस्ट 10, 2022 3:32 PM
Indian-Asia-Cup
---Advertisement---

आशिया चषक २०२२ सुरू होण्यासाठी आता काही आठवडे उरले आहेत. आशिया चषक २७ ऑगस्ट रोजी दुबई येथे श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यातील लढतीने सुरू होईल. टीम इंडियाही काही दिवसांत यूएईला रवाना होणार आहे. पण त्याआधी भारतीय निवड समितीने आशिया कप २०२२ साठी १५ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. ज्यामध्ये अनेक अनुभवी खेळाडू आणि काही युवा खेळाडूंचीही नावे आहेत.

भारताला या स्पर्धेची (आशिया कप २०२२) सुरुवात विजयाने करायची आहे. त्याचबरोबर संघाला पहिल्या सामन्यातच पाकिस्तान संघाचा सामना करावा लागणार आहे. अशा परिस्थितीत संघ व्यवस्थापन त्या खेळाडूंना सामन्यात संधी देऊ शकते, ज्याचा ते पुरेपूर फायदा घेऊ शकतात. या लेखात, आम्ही अशा तीन खेळाडूंबद्दल बोलणार आहोत, ज्यांना एशिया कप २०२२च्या संघात स्थान मिळाले असेल, परंतु ते फक्त बेंचवर बसलेले दिसतील असे क्रिकेट जाणकारांचे मत आहे.

१. रवी बिश्नोई

Rohit Sharma Rishabah Pant Ravi Bishnoi
Photo Courtesy: Twitter/ICC

रवी बिश्नोईमध्ये आपल्या गोलंदाजीने विरोधी संघाला धूळ चारण्याची ताकद असली तरी 2२०२२च्या आशिया चषक स्पर्धेत प्लेइंग इलेव्हनचा भाग बनणे त्याला कठीण जाणार आहे. वास्तविक, आशिया चषक २०२२ साठी निवडलेल्या फिरकीपटूंमध्ये युझवेंद्र चहल, रविचंद्रन अश्विन या अनुभवी गोलंदाजांचा समावेश आहे आणि या खेळाडूंच्या उपस्थितीत रवीला खेळणे कठीण जाईल. अशा परिस्थितीत कदाचित कर्णधार रोहित शर्मा बिश्नोईऐवजी अनुभवी खेळाडूला प्लेइंग इलेव्हनमध्ये घेणे पसंत करेल. मात्र, तो सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये असल्याचे दिसत आहे. नुकत्याच झालेल्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-२० सामन्यातही त्याने चमकदार कामगिरी केली आहे.

२. आवेश खान

Avesh-Khan
Photo Courtesy: bcci.tv

आवेश खानला आशिया कप २०२२मध्ये टीम इंडियाचे प्रतिनिधित्व करण्याची सुवर्ण संधी मिळाली आहे. पण त्याचा सध्याचा फॉर्म पाहता आवेश या सामन्यात बेंचवर बसलेला दिसतो असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय संघात सामील झाल्यापासून तो आयपीएलच्या गेल्या काही काळात बॉलवसोबत तितका प्रभावी ठरला नाही. टी-२०च्या आत्तापर्यंतच्या १२ डावांमध्ये ईकॉनॉमीच्या बाबतीत आवेशची कामगिरी अत्यंत खराब राहिली आहे. त्याच्या खात्यात ८ पेक्षा जास्त इकॉनॉमी रेटसह ११ बळींची नोंद आहे. त्याने आंतरराष्ट्रीय टी-२० कारकीर्दीत आतापर्यंत ३१.८१ च्या सरासरीने आणि २२च्या स्ट्राइक रेटसह हलकी कामगिरी केली आहे.

३. दीपक हुडा

Deepak-Hooda-Virat-Kohli
Photo Courtesy : Twitter/ BCCI

टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू दीपक हुडा सध्या चांगलाच फॉर्ममध्ये दिसत असून तो उपयुक्त धावा करत आहे. मात्र, संघात अनेक अनुभवी अष्टपैलू खेळाडूंच्या उपस्थितीमुळे त्याचा प्लेइंग इलेव्हनमधील समावेश धोक्यात आला आहे. कारण संघात आधीच हार्दिक पंड्या आणि रवींद्र जडेजासारख्या अष्टपैलू खेळाडूंचा समावेश आहे. अशा स्थितीत साहजिकच निवडसमिती जडेजासारख्या अनुभवी खेळाडूला प्राधान्य देईल.

आशिया चषकात भारताची संभाव्य प्लेइंग ११
रोहित शर्मा (कर्णधार), के एल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक, रविंद्र जडेजा, युझवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

मुंबईची वन‌ फॅमिली बनली ग्लोबल! दक्षिण आफ्रिका आणि युएईतील फ्रॅंचाईजींच्या नावाची झाली घोषणा

रोहित-द्रविड जोडगोळीमुळे फळफळलंय ‘या’ सिनीयर खेळाडूंचं नशीब, एकटा ३ वर्षांपासून होता बाहेर

VIDEO। संजूने अनोख्या अंदाजात केलं चाहत्यांचं अभिवादन, गाडीतून उतरत थेट ठोकला सलाम

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---