---Advertisement---

या ३ भारतीय महिला क्रिकेटर, ज्यांचे वनडे द्विशतक हुकले थोडक्यात

On: शनिवार, जुलै 25, 2020 1:16 PM
---Advertisement---

अनेक वर्षांच्या संघर्षानंतर अखेर भारतीय महिला क्रिकेट संघाला त्याची एक वेगळी ओळख मिळालेली दिसते. तळागाळातील स्तरावर, तरुण मुलींना क्रिकेट खेळण्यास प्रोत्साहित केले जात आहे आणि या बदलाचे परिणाम आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील जाणवले जाऊ लागले.भारतीय महिला संघाने २०२० टी२० विश्वचषक आणि २०१७ च्या वनडे विश्वचषकातील अंतिम फेरीत गाठून हे सिद्ध केले. काही निराशाजनक निकाल जरी लागले असले तरी शेफाली वर्मासारख्या बर्‍याच तरुण खेळाडूंनी चाहत्यांना चांगला विश्वास दिला आहे.

महिलांचा क्रिकेट तितकासा आक्रमक किंवा वेगवान नसले तरी महिलांच्या वनडे क्रिकेटमध्ये दोन दुहेरी शतके साकारली आहेत- न्यूझीलंड क्रिकेटपटू अमेलिया केर (Amelia Kerr) २३२ धावा आणि ऑस्ट्रेलिया क्रिकेटपटू बेलिंडा क्लार्क (Belinda Clark) २२९ धावांची खेळी केली आहे. विशेष म्हणजे सचिन तेंडुलकरने पहिल्यांदा वनडेत द्विशतक करण्याआधीच बेलिंडा क्लार्कने १९९७ ला डेन्मार्क विरुद्ध द्विशतकी खेळी साकारली होती. त्यावेळी ती वनडेत द्विशतक करणारी पहिला क्रिकेटपटू (महिला आणि पुरुष मिळून) ठरली होती.

भारतीय महिला क्रिकेटपटूंनीही अनेकदा वनडेत चांगल्या खेळी केल्या आहेत. त्यांना काहीवेळी द्विशतक करण्याचीही संधी मिळाली परंतू त्यांची ही संधी थोडक्यात हुकली. अशाच ३ भारतीय महिला क्रिकेटपटूंबद्दल जाणून घेऊ ज्यांना वनडेत द्विशतकी खेळी करण्याची संधी मिळाली होती.

३. स्मृती मंधाना (Smriti Mandhana) – १३५ धावा

आयसीसी महिला चॅम्पियनशिप ही पुढील विश्वचषकातील सहभागी संघ निश्चित करण्याच्या उद्देशाने आयोजित केलेली एक स्पर्धा आहे. २०१८ मध्ये, भारताने २०२१ विश्वचषक स्पर्धेच्या पात्रतेसाठी किंबर्ली येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सामना खेळाला.
भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना ३०३ धावांचा विशाल डोंगर रचून एक विक्रमी धावसंख्या रचली. त्यात भारताकडून फलंदाजीला आल्यानंतर स्मृती मंधानाने मॅरिझाने कॅप आणि डेन व्हॅन निकेरक यांच्या वेगवान गोलंदाजीवर तुफान फटकेबाजी केली. स्मृतीने सलामीला येऊन केवळ १२९ चेंडूंत १३५ धावा फटकावल्या आणि भारताला ३०३ या विक्रमी धावसंख्येपर्यंत पोचवलं.

भारतीय डावातील अवघी ७ षटके शिलक्क होती, त्याचवेळी स्मृती बाद झाली. जर ती बाद झाली नसती तर तिच्याकडे आक्रमक खेळत द्विशतक पूर्ण करण्याची संधी होती. पण तिची ही द्विशतकाची संधी हुकली. पण ह्या आक्रमक खेळीत तिने १४ चौकार, १ षटकार मारले.

त्यावेळी दक्षिण आफ्रिकेसाठी अशक्य अशी ही धावसख्या होती. भारतीय त्रिकुटाने म्हणजे राजेश्वरी गायकवाड, पूनम यादव आणि दीप्ती शर्मा या फिरकी त्रिकुटाने अवघ्या १२४ धावांवर दक्षिण आफ्रिकेचा डाव गुंडाळून १७८ धावांनी दणदणीत विजय मिळवून दिला.

२. हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) – नाबाद १७१ धावा

भारतीय महिला टी२० संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर ही देखील वनडे क्रिकेटमधील दुहेरी शतकाच्या अगदी जवळ आली होती आणि तिने सर्वात मोठ्या स्पर्धेत अशी कामगिरी केली होती. २०१७ च्या विश्वचषकात ऑस्ट्रेलियाविरूद्ध कौरने डर्बी येथे झालेल्या उपांत्य सामन्यात तिने ही खेळी साकारली.

पावसामुळे कमी केलेल्या २ षटकांच्या या सामन्यात तिने केवळ ११५ चेंडूत नाबाद १७१ धावांची नोंद केली. २० चौकार आणि ७ षटकारांसह तिच्या या खेळीने भारताला सन्मानजनक अशा २८१ धावांवर नेवून ठेवले आणि विशेष म्हणजे वनडे सामन्यात ही भारतीय महिलेची दुसर्‍या क्रमांकाची सर्वोच्च वैयक्तीक धावसंख्या आहे. हरमनप्रीतला जर त्यावेळी आणखी चेंडू खेळण्याची संधी मिळाली असती तर ती कदाचीत द्विशतकी खेळी त्यादिवशी करु शकली असती.

त्या सामन्यात दिप्ती शर्मा, शिखा पांडे आणि झुलन गोस्वामी यांच्या भेदक गोलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियाचा डाव २४५ धावांवर संपुष्टात आला.
इंग्लंडविरुद्धच्या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात कौरनेदेखील ५१ धावा ठोकल्या पण अन्या श्रुब्सोलेच्या ६ विकेट्समुळे यजमानांनी लॉर्ड्स येथे ९ धावांनी विजय नोंदीवला.

१. दीप्ती शर्मा (Deepti Sharma) – १८८

भारतीय अष्टपैलू दीप्ती शर्माने वनडे क्रिकेटमधील २०० धावांचा विक्रम करण्यासाठी सर्वात जवळ पोहचली होती. २०१७ साली यजमान दक्षिण आफ्रिका, आयर्लंड आणि झिम्बाब्वे यांचा समावेश असलेल्या महिलांच्या चतुष्कोणीय मालिकेत भारताने विजय मिळवला होता. या मालिकेतील आयर्लंडविरुद्धच्या सामन्यात सलामीवीर शर्माने केवळ १६० चेंडूत १८८ धावा केल्या होत्या. दुर्दैवाने, २७ चौकार आणि २ षटकारांसह तिची ही खेळी ४६ व्या षटकात संपुष्टात आली. महिला वनडे सामन्यात ती भारताची पहिली द्विशतकवीर बनू शकली असती. परंतु राहेल डेलनेकडून ती धावबाद झाली. तिचे द्विशतक केवळ १२ धावांनी हुकले.

आयर्लंडला भारताने दिलेल्या ३५६ धावांचा पाठलाग करता आला नाही आणि केवळ १०९ धावांवर आयर्लंड संघ गारद झाला. राजश्री गायकवाडने ४ विकेट्स घेत त्यावेळी महत्त्वपूर्ण कामगिरी केली. शर्माने गोलंदाजी करतानाही एक विकेट घेतली. त्यामुळे शर्मा च्या चमकदार कामगिरीसाठी तिला सामनावीर (प्लेअर ऑफ द मॅच) पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. भारताने या सामन्यात आयर्लंडवर २४९ धावांनी विजय मिळवला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---