आयपीएल 2025 पूर्वी मेगा लिलाव होणार आहे. या लिलावात सर्व फ्रँचाईजींकडे फक्त काही खेळाडूंनाच रिटेन करण्याची संधी असेल. आता ते खेळाडू किती असतील, याबाबत अद्याप काहीही स्पष्टता नाही.
आयपीएलच्या आगामी हंगामामध्ये अनेक संघांचे कर्णधार बदलणार आहेत. काही संघांची नजर भारताचा विस्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादवला कर्णधार करण्याकडे असेल. सूर्याला नुकतेच भारतीय टी20 संघाचा कर्णधार बनवण्यात आलंय. या बातमीमध्ये आम्ही तुम्हाला अशा 3 फ्रँचाईजींबद्दल सांगणार आहोत, ज्या सूर्यकुमारला आपला कर्णधार बनवण्यासाठी प्रयत्न करू शकतात.
(1) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू – फाफ डू प्लेसिस आयपीएल 2022 पासून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार आहे. मात्र गेल्या तीन वर्षांत तो आरसीबीला विजेतेपद मिळवून देण्यात अयशस्वी ठरला. आता बोललं जात आहे की, आरसीबीबी आगामी मेगा लिलावापूर्वी डू प्लेसिसला रिटेन करणार नाही. फलंदाज म्हणून डू प्लेसिसनं आरसीबीसाठी खूप चांगली कामगिरी केली, यात काही शंका नाही. मात्र तो आता 39 वर्षांचा झाला आहे. शक्यता आहे की तो आयपीएल 2025 पूर्वी निवृत्तीची घोषणाही करू शकतो. अशा परिस्थितीत फ्रँचाईजी सूर्यकुमार यादवला आपला नवा कर्णधार बनवू शकते.
(2) लखनऊ सुपर जायंट्स – केएल राहुल सध्या लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार आहे. मात्र गेल्या हंगामात त्याची संघमालक संजीव गोयंका यांच्यासोबत बाचाबाची झाली होती. त्यामुळे बोललं जात आहे की, राहुल आगामी हंगामापूर्वी लखनऊची साथ सोडू शकतो. अशा परिस्थितीत संघ सूर्यकुमार यादववर बोली लावू शकतो. याशिवाय त्याला संघाचं कर्णधारपदही दिलं जाऊ शकतं.
(3) दिल्ली कॅपिटल्स – या लिस्टमध्ये दिल्ली कॅपिटल्सचं नावही शामील आहे. अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा केला आहे की, आयपीएल 2025 पूर्वी रिषभ पंत दिल्ली कॅपिटल्सची साथ सोडणार आहे. अशा परिस्थितीत संघाला अशा खेळाडूची गरज भासेल, जो शानदार फलंदाजीसह संघाचं नेतृत्व देखील करेल. सूर्यकुमार यादव या बाबतीत एकदम फिट बसतो. त्यामुळे दिल्ली कॅपिटल्स त्याला आपल्या संघात शामील करून घेण्याची संधी निश्चितच सोडणार नाही.
महत्त्वाच्या बातम्या –
“मी यापेक्षा अधिक काय करू”, मोहम्मद शमीचा टीम मॅनेजमेंटला सवाल; विश्वचषकात मिळाली नव्हती संधी
क्रिकेटच्या मैदानात चक्क कोल्होबाची एंट्री! सैरभैर धावून केलं प्रेक्षकांचं मनोरंजन, एकदा VIDEO पाहाच
गौतम गंभीरची इच्छा पूर्ण! टीम इंडियाच्या कोचिंग स्टाफमध्ये दाखल होणार केकेआरमधील साथीदार