---Advertisement---

राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेतून निवडलेल्या संभाव्य महिला खेळाडूंच्या यादीत ३ मराठमोळ्या खेळाडूंची वर्णी.

On: गुरूवार, मार्च 12, 2020 10:34 PM
---Advertisement---

जयपूर-राजस्थान येथे ६७ वि वरीष्ठ गट राष्ट्रीय अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा पार पडली. (67th Senior National Kabaddi Championship) यास्पर्धेत भारतीय रेल्वेच्या दोन्ही संघांनी विजेतेपद कायम राखत आपले वर्चस्व प्रस्थापित ठेवले. एकेएफआय च्या मान्यतेने राजस्थान राज्य कबड्डी असोसिएशन आयोजित राष्ट्रीय स्पर्धा २ मार्च ते ६ मार्च २०२० दरम्यान पौर्णिमा युनिव्हर्सिटीच्या मैदानात पार पडली. सदर यादीत मराठमोळ्या ३ महिला खेळाडूंची निवड करण्यात आली आहे.

महिला विभागात भारतीय रेल्वेने हिमाचल वर विजय मिळवत विजेतेपद पटकावले. महिला संघाच्या निवडीसाठी सुनील दाबास, पद्मजा बाला व जगपाल सिंग यांनी काम केलं. निवड समितीने सदर स्पर्धेतून ३६ जणांची निवड संभाव्य भारतीय संघात निवड केली आहे. तर २ खेळाडूंना राखीव ठेवले आहे.

महिला विभागात भारतीय रेल्वेचे ५ तर हिमाचल प्रदेशच्या ५ खेळाडूंचा समावेश आहे. मराठमोळ्या तीन खेळाडूंपैकी १ भारतीय रेल्वे, १ महाराष्ट्र तर १ खेळाडु गोवा संघातील आहे. भारतीय रेल्वे कडून सोनाली शिंगटे (Sonali Shingate), महाराष्ट्रा कडून लेफ्ट कॉर्नर खेळणाऱ्या मेघा कदम (Megha Kadam) तर गोव्या कडून नेहा घाडगे (Neha Ghadage) ह्या मराठमोळ्या खेळाडूंची संभाव्य यादी मध्ये निवड करण्यात आली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---