क्रिकेटचा भव्यपणा आयपीएलच्या १३ व्या सत्रापासून सुरू होणार आहे. दरम्यान, क्रिकेटच्या कॉरिडॉरमध्ये फक्त आगामी आयपीएल हंगामाची चर्चा आहे. संघांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये गोलंदाज आणि फलंदाज तसेच अष्टपैलू खेळाडूंचा समावेश असतो.
खरं तर, संघातील फलंदाजी आणि गोलंदाजीसह संघात उपस्थित अष्टपैलू खेळाडूदेखील आपल्या क्षेत्ररक्षणासह सामना जिंकून देऊन संघात महत्वाची भूमिका बजावतात. ज्याप्रमाणे आयपीएलमध्ये सर्वोत्कृष्ट फलंदाज आणि गोलंदाज आहेत, त्याचप्रकारे असे काही अष्टपैलू खेळाडूही या स्पर्धेत भाग घेतात. या लेखात तुम्हाला अष्टपैलू खेळाडूंबद्दल सांगणार आहोत जे आयपीएलच्या सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडूंपैकी एक आहेत.
आयपीएलचे ३ सर्वात धोकादायक अष्टपैलू खेळाडू
१. कायरन पोलार्ड
वेस्ट इंडिज क्रिकेट संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू कायरन पोलार्ड आयपीएलमध्ये सुरुवातीपासूनच मुंबई इंडियन्सकडून खेळताना दिसत आहे. पोलार्ड हा संघाचा मॅच विनर खेळाडू आहे आणि तो कर्णधार रोहित शर्माचे सर्वात मोठे शस्त्र आहे.
गेल्या दोन मोसमात कर्णधार रोहित शर्माने पोलार्डला गोलंदाजीची संधी दिली नाही. परंतु फलंदाजीच्या जोरावर संघाला सामना जिंकण्यासाठी तो नेहमी मदत करत आहे. पोलार्ड क्षेत्ररक्षक म्हणूनही खूप चांगला आहे, सीमारेषेवर झेल घेण्यास तो पटाईत आहे.
पोलार्डने आयपीएलमध्ये आतापर्यंत १५१ सामने खेळले असून त्यात त्याने १४८.७ च्या स्ट्राईक रेटने २८४६ धावा केल्या आहेत. याशिवाय गोलंदाजीत त्याने ३१.६४ च्या सरासरीने ५७ बळी घेतले आहेत. तसेच क्षेत्ररक्षण करताना त्याने ८५ झेल घेतले आहेत. त्याच्या या कामगिरीवरून तो एक यशस्वी अष्टपैलू खेळाडू आहे हे सिद्ध होते.
२. ड्वेन ब्राव्हो
चेन्नई सुपर किंग्जचा स्टार अष्टपैलू ड्वेन ब्राव्होलाही आतापर्यंतच्या आयपीएलच्या इतिहासातील सर्वात प्रभावी अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखले जाते. ब्राव्हो हा कर्णधार एमएस धोनीच्या संघाचा मुख्य मॅच विनर खेळाडू आहे.
विंडीज संघाच्या या अष्टपैलू खेळाडूची आयपीएल कारकfर्दीची सुरुवात मुंबई इंडियन्सपासून झाली. त्यानंतर २०११ मध्ये त्याने चेन्नई सुपर किंग्ज संघात प्रवेश केला. चेन्नई संघात सामील झालेल्या ब्राव्होने संघाच्या वेगवान गोलंदाजीची तसेच पावर हिटींगची धुरा सांभाळली.
ब्राव्हो क्षेत्ररक्षणात देखील खूप मदत करतो. या चपळ खेळाडूने बर्याच वेळा कठीण झेल पकडले आहेत. आयपीएलच्या इतिहासात ड्वेन ब्राव्होने १३४ सामन्यांत १२८.२८ च्या स्ट्राइक रेटसह १४८३ धावा केल्या आहेत. याशिवाय त्याने गोलंदाजीत २४.६० च्या सरासरीने १४७ बळी टिपले आहेत. तसेच त्याने ७४ फलंदाजांचे झेल पकडले आहेत. ही आकडेवारी या अष्टपैलू खेळाडूची क्षमता सिद्ध करते.
परंतु ड्वेन ब्राव्हो दुखापतग्रस्त असल्याने आयपीएल २०२० च्या हंगामातील सुरुवातीच्या सामन्यांत खेळताना दिसला नाही. त्याची उणीव संघाला नक्कीच जाणवली आहे.
३. रवींद्र जडेजा
भारतीय क्रिकेट संघाचा स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजा आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्ज संघाचा मुख्य फिरकी गोलंदाज आहे. जडेजा हा कर्णधार धोनीचा विश्वासू अष्टपैलू खेळाडू आहे.
रवींद्र जडेजा अंतिम अकरामध्ये सामील झाल्यामुळे संघाला एक महान फिरकी गोलंदाज, फलंदाज तसेच एक क्षेत्ररक्षक मिळाला जो कोठेही क्षेत्ररक्षण करून संघासाठी महत्वपूर्ण धावा वाचवू शकतो.
जडेजाने आयपीएलमध्ये आतापर्यंत १७३ सामने खेळले आहेत. यात त्याने १२२.७९ च्या स्ट्राईक रेटने १९५० धावा केल्या आहेत. यासह त्याने २९.८० च्या सरासरीने ११० बळी मिळवले आहेत. त्याचबरोबर जाडेजाने ६३ झेल घेतले आहेत. आयपीएलमध्ये चेन्नईने जिंकलेल्या जेतेपदामध्ये जडेजाचेही मोठे योगदान आहे, यात काही शंका नाही.