आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना जूनमध्ये इंग्लंडच्या साऊथॅम्प्टन येथे खेळला जाणार आहे. अंतिम सामन्यात भारत आणि न्यूझीलंड समोरासमोर असतील. हा सामना 18 ते 22 जून दरम्यान खेळला जाणार आहे. 1 ऑगस्ट 2019 पासून सुरु झालेल्या या स्पर्धेत दोन्ही संघ वेगवेगळ्या मालिकांमधून जोरदार कामगिरी करुन अंतिम फेरीत पोहोचले आहेत. आता या अंतिम सामन्याचा उत्साह शिगेला पोहोचला आहे.
या अंतिम सामन्यात गोलंदाजांची भूमिका दोन्ही संघांसाठी महत्त्वाची ठरणार आहे. कारण विरोधी संघाचे 20 बळी कमी धावसंख्येत घेणारा संघाला विजयाची हमी जास्त असते, असे म्हटले जाते. तसेच इंग्लंडमध्ये स्विंग गोलंदाजांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. या लेखात आपण बघणार आहोत न्यूझीलंडकडून जागतिक अजिंक्यपद स्पर्धेमध्ये सर्वाधिक विकेट घेणारे टॉप 3 गोलंदाज.
3)ट्रेंट बोल्ट –
डावखुरा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट आयपीएलमुळे भारतीय चाहत्यांची मने जिंकण्यात यशस्वी झाला आहे. न्यूझीलंडला कसोटी अजिंक्यपद स्पर्धेमध्ये मिळालेल्या यशात बोल्टची मोलाची भूमिका राहिलेली आहे. या स्पर्धेत त्याने 9 सामन्यांतील 18 डावांमध्ये 34 बळी घेतले आहेत. आपल्या स्विंग गोलंदाजीमुळे तो अंतिम सामन्यात भारतीय फलंदाजांसमोर अडचणी निर्माण करू शकतो.
2)काईल जेमीसन –
काईल जेमीसनने 2020 मध्ये न्यूझीलंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. पण थोड्या कालावधीतच त्याने आपली छाप सोडली आहे. जेमीसनने भारताविरुद्धच कसोटी पदार्पण केले होते हे विशेष. अतिरिक्त बाऊन्स आणि स्विंग ही त्याच्या गोलंदाजीची ताकद आहे. कसोटी अजिंक्यरद स्पर्धेत त्याने केवळ 6 सामन्यांत 36 बळी घेतलेले आहेत. जेमीसन देखील अंतिम सामन्यात भारतासमोरचा मोठा धोका असणार आहे.
1)टीम साऊथी –
टीम साऊथी हा सध्या न्यूझीलंडच नव्हे तर जागतिक क्रिकेटमध्येही सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक मानला जातो. दोन्ही बाजूंना चेंडू स्विंग करण्याच्या कलेमुळे तो आणखीनच घातक ठरत असतो. अंतिम सामन्यात बोल्ट आणि साऊथीची जोडी भारतासाठी धोकादायक ठरू शकते. न्यूझीलंडकडून कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत साऊथीने सर्वाधिक विकेट्स घेतलेल्या आहेत. त्याने 10 कसोटीमध्ये 51 फलंदाजांची शिकार केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
“मी भारत खूप जवळून पाहिला आहे, यामुळेच यावेळेस केवळ वेदनाच होत नाही तर…”, मॅथ्यू हेडन हळहळला
व्हेंटिलेटरवर असलेल्या एका रुग्णासाठी देवदूत बनला युजवेंद्र चहल, ‘अशाप्रकारे’ केली मदत






