---Advertisement---

ऑस्ट्रेलिया, इंग्लंड नव्हे तर न्यूझीलंड संघ ठरतोय भारतासाठी घातक, १ वेळा हिसकावलाय विश्वचषक

On: शुक्रवार, जून 4, 2021 5:45 AM
---Advertisement---

दिनांक १८ जून २०२१ रोजी भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषध (आईसीसी) आयोजित जागतिक कसोटी अजिंक्यपद अंतिम सामना होणार आहे. तत्पुर्वी उभय संघ इंग्लंडला पोहोचले आहेत. न्यूझीलंड संघ प्रथम इंग्लंडविरुद्ध २ कसोटी सामन्यांची मालिका खेळत आहे. म्हणून न्यूझीलंड संघाला सराव करण्यासाठी भारतीय संघापेक्षा जास्त कालावधी मिळाला आहे.

दुसरीकडे भारतीय संघही जागतिक कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यासाठी तयारी करत आहे. मागील काही काळात भारतीय संघाने कसोटीत खूप छान असे प्रदर्शन केले आहे. तसेच खेळाडूसुद्धा चांगल्याच फॉर्ममध्ये आहेत. त्यामुळे भारतीय संघसुद्धा न्यूझीलंड संघाला चांगलेच आव्हान देऊ शकतो.

जर आपण आईसीसीच्या स्पर्धांचा इतिहास पाहिल्यास न्यूझीलंड संघाने भारतीय संघाला नेहमीच कडवे आव्हान दिले आहे. याच गोष्टीला लक्षात घेता आज आपण या लेखात जाणून घेणार आहोत, आजवर झालेल्या भारत विरुद्ध न्यूझीलंड आसीसीच्या सामन्यांचा आढावा.

३. आईसीसी नॉकआउटचा अंतिम सामना, २०००
२००० साली खेळण्यात आलेल्या ‘आईसीसी नॉकआउट’मध्ये भारतीय संघाला विजयाचे प्रबळ दावेदार म्हटले जात होते. कारण भारतीय संघाने त्या स्पर्धेत ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकासारख्या बलाढ्य संघाना हरवले होते. म्हणून न्यूझीलंडविरुद्ध भारतीय संघच हा सामना जिंकेल अशी खात्री होती. परंतु न्यूझीलंड संघाने सुंदर खेळी करून सर्वांना आश्चर्यचकित केले आणि भारतीय संघाला हरवून अंतिम सामना जिंकला.

न्यूझीलंड संघाने त्या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररकक्षणाचा निर्णय घेतला होता. भारतीय फलंदाज सचिन तेंडूलकर आणि सौरव गांगुलीने १०० धावांची सलामी दिली होती. सचिनने सामन्यात ६९ धावा तर गांगुलीने ११७ धावांची खेळी केली होती. भारताने सामन्यात एकूण २६४/६ इतक्या धावा केल्या होत्या. भारताच्या २६५ धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंड संघाचे २-३ गडी पटपट बाद झाले. न्यूझीलंड संघ कठीण परिस्थिती असताना क्रिस क्रेंसने शतकिय खेळी करून न्यूझीलंड संघाला २ चेंडू राखून विजय मिळवून दिला होता.

२. टी-२० विश्वचषक सामना तेरावा, २०१६
भारतात झालेली २०१६ ची टी-२० विश्वचषक स्पर्धा ही भारतच जिंकणार असे सगळीकडे बोलले जात होते. या स्पर्धेचा १३वा सामना भारत विरुद्ध न्यूझीलंड असा रंगला होता. नाणेफेक जिंकून न्यूझीलंड संघाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. न्यूझीलंड संघाने २० षटकात १२६ धावा केल्या होत्या. १२७ धावांचा लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाच्या नाकी नऊ आली होती.

विराट कोहली, एमएस धोनी आणि आर अश्विन या फलंदाजांना सोडल्यास बाकी एकही फलंदाजाला १० धावाही करता आल्या नव्हत्या. न्यूझीलंडच्या फिरकी गोलंदाजांनी खूपच सुंदर गोलंदाजी केली होती. यामुळे भारतीय संघ केवळ ७९ धावांवर गारद झाला होता. न्यूझीलंडने हा सामना ४७ धावांनी जिंकला होता.

३. विश्वचषक उपांत्यफेरी सामना, २०१९
२०१९चा विश्वचषक उपांत्य सामना. या सामन्याचे घाव अजूनही भारतीय क्रिकेटप्रेमींच्या मनातून काही जात नसतील. या सामन्यात न्यूझीलंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मार्टिन गप्टीलच्या स्वरुपात भारताला पहिला बळी मिळाला होता. परंतु, नंतरच्या ३ फलंदाजांनी न्यूझीलंडचा डाव सांभाळून घेतला होता. त्यात रॉस टेलरने सर्वाधिक ७४ धावा केल्या होत्या. दरम्यान, भारतीय गोलंदाजांनी पुन्हा सामन्यात पकड बनवली आणि न्यूझीलंड संघाला २३९ धावत रोखले होते.

न्यूझीलंडच्या २४० धावांचा आव्हानाचा पाठलाग करणे हे भारतीय संघासाठी काही मोठे आव्हान नव्हते. परंतु, न्यूझीलंड संघाच्या वेगवान गोलंदाजांनी भारतीय संघाच्या सलामीच्या आणि मधल्या फळीतील फलंदाजांचे कंबरडे मोडले. भारतीय संघाची अवस्था तिसाव्या षटकापर्यंत ९२/६ अशी होती. नंतर एमएस धोनी आणि रविंद्र जडेजा यांच्यात शतकी भागीदारी झाली. जडेजाने ताबडतोड ७७ धावा केल्या आणि नंतर तोही बाद झाला. शेवटी धोनीने आशेचे किरण टिकवून ठेवले होते. परंतु तोही धावबाद झाला आणि सर्व भारतीयांचे स्वप्न तुटले. न्यूझीलंड संघाने हा सामना १८ धावांनी जिंकला होता.

महत्त्वाच्या बातम्या-

‘ट्रान्सफर विंडो’ची सुविधा असती, तर ‘या’ भारतीयांनी गाजवली असती परदेशी लीगची मैदाने!

वनडे कारकिर्दीची दणक्यात सुरुवात करणारे ३ भारतीय, एकाने पदार्पणात केलंय शतक

अनुभवी भुवनेश्वर कुमार इंग्लंड दौऱ्यावर दुर्लक्षित, ‘ही’ आहेत त्यामागची प्रमुख कारणे

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---