---Advertisement---

सय्यद मुश्ताक अली टी-20 ट्रॉफी मध्ये शानदार कामगिरी करणाऱ्या ‘या’ तीन खेळाडूंना मिळू शकते आयपीएलचे तिकीट

On: मंगळवार, फेब्रुवारी 2, 2021 10:56 PM
---Advertisement---

आयपीएलच्या 14 व्या हंगामाची सर्व संघांकडून जय्यत तयारी सुरू झाली आहे .काही दिवसांपूर्वीच सर्व संघांनी आपल्या रिलीज केलेल्या खेळाडूंची यादी देखील जाहीर केली. स्टीव स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल, हरभजन सिंग, केदार जाधव सारख्या खेळाडूंना संघांनी सोडलेले असल्याने आगामी आयपीएल लिलावाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

या स्टार खेळाडूंसोबतच प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये शानदार कामगिरी करत असलेल्या भारतीय खेळाडूंना देखील आयपीएल लिलावात मोठी बोली लागू शकते. आपण या लेखात बघणार आहोत असे तीन खेळाडू ज्यांना सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी मधील शानदार कामगिरीचे फळ आयपीएल लिलावात मिळू शकते.

1) शेल्डन जॅक्सन –

सय्यद मुश्ताक अली टी-20 ट्रॉफीमध्ये पुडुचेरी संघाकडून खेळत असलेल्या शेल्डन जॅक्सनने उत्तम कामगिरी केली. संपूर्ण मालिकेमध्ये त्याने एकूण 200 पेक्षा जास्त धावा केल्या असून त्याचा स्ट्राईक रेट देखील जबरदस्त राहिलेला आहे. जॅक्सनने हरियाणा विरुद्ध 82 धावा तसेच आंध्रप्रदेश विरुद्ध शानदार शतक देखील ठोकले आहे. जॅक्सनने 80.66 ची सरासरी व 155.12 च्या स्ट्राईक रेटने 242 धावा केल्या असून, वेळप्रसंगी यष्टीरक्षण करण्याचे कौशल्य असल्यामुळे जॅक्सनवर अनेक संघ डाव लावू शकतात.

2) लुकमन मेरिवाला –

लुकमन मेरिवालाने सय्यद मुश्ताक अली टी-20 ट्रॉफी मध्ये बडोदा संघाचे प्रतिनिधित्व केले. मेरिवालाने संपूर्ण मालिकेदरम्यान आपल्या खेळाने क्रिकेट रसिकांची मने जिंकली आहेत. त्याने केवळ 6.27 च्या इकॉनोमी रेटने एकूण 14 बळी मिळवले. मेरिवाला डावखुरा वेगवान गोलंदाज असल्याने त्याला आयपीएलमध्ये संधी मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. अनेक संघ सध्या भारतीय वेगवान गोलंदाजांच्या शोधात असून मेरिवाला हा त्यांच्यासाठी फायद्याचा खेळाडू ठरू शकतो.

3) विष्णू सोलंकी –

मेरीवाला प्रमाणेच बडोदाकडून खेळताना विष्णू सोलंकीने शानदार कामगिरी केली.त्याने 128.37 च्या स्ट्राईक रेटने एकूण 267 धावा केलेल्या आहेत. मधल्या फळीत देखील सोलंकी शानदार फलंदाजी करण्यात यशस्वी करू शकतो व त्यामुळेच आयपीएल लिलावामध्ये त्याच्यावर मोठी बोली लागण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या:

ऑस्ट्रेलियाच्या निर्णयामुळे न्यूझीलंडची जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक, दुसऱ्या स्थानासाठी या संघांमध्ये चुरस

विजय हजारे ट्रॉफीत नवा खेळाडू करणार कर्नाटकचे नेतृत्व, असा आहे संघ

दोन कंपन्यांचा मालक बनविणार पहिल्या कसोटीची खेळपट्टी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---