जगभरातील सर्व चाहते आयपीएल 2025 च्या मेगा लिलावाची आतुरतेने वाट पाहत होते. आता जेद्दाहमध्ये मेगा लिलाव सुरू आहे. आयपीएलच्या गव्हर्निंग कौन्सिलने लिलावासाठी 1574 पैकी 577 खेळाडूंची निवड केली आहे. पहिल्या 2 सेटमध्ये मार्की खेळाडूंना स्थान देण्यात आले. यावेळी रिषभ पंत (Rishabh Pant) आणि श्रेयस अय्यरवर (Shreyas Iyer) पैशांचा पाऊस पडला. दोन्ही खेळाडूंनी कमाईच्या बाबतीत सर्व जुने रेकाॅर्ड मोडीत काढले. त्याचवेळी व्यंकटेश अय्यरलाही अपेक्षेपेक्षा खूप मोठी रक्कम मिळाली.
तत्पूर्वी या बातमीद्वारे आपण आयपीएल 2025च्या मेगा लिलावात 20 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम कमावणाऱ्या 3 खेळाडूंबद्दल जाणून घेऊया.
1) रिषभ पंत- डावखुरा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत (Rishabh Pant) 2016 पासून दिल्ली कॅपिटल्सचा (DC) भाग होता, पण आता त्याचे फ्रँचायझीशी असलेले नाते तुटले आहे. लखनऊ सुपर जायंट्सने (LSG) पंतला 27 कोटी रुपयांना विकत घेतले आहे. यासह पंत आयपीएलच्या इतिहासात विकला जाणारा सर्वात महागडा खेळाडू बनला आहे.
2) श्रेयस अय्यर- श्रेयस अय्यरच्या (Shreyas Iyer) नेतृत्वाखालील कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) शेवटच्या आयपीएल हंगामात तिसऱ्यांदा विजेतेपद पटकावले. तरीही फ्रँचायझीने त्याला कायम न ठेवण्याचा निर्णय घेतला होता. पण मेगा लिलावात अय्यरने लिलावात जुने विक्रम मोडीत काढले. लिलावात पंजाब किंग्ज संघाने अय्यरला 26.75 कोटी रुपयांना विकत घेतले आहे.
3) व्यंकटेश अय्यर- व्यंकटेश अय्यरने (Venkatesh Iyer) आयपीएलच्या शेवटच्या हंगामात कोलकाता नाईट रायडर्सचे (KKR) प्रतिनिधित्व केले होते. त्याची कामगिरीही चांगली होती, पण असे असतानाही फ्रँचायझीने त्याला कायम ठेवले नाही. पण मेगा लिलावात त्याला परत घेण्यात फ्रँचायझीला यश आले. केकेआरने व्यंकटेशला 23.75 कोटींना विकत घेतले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
ZIM vs PAK; झिम्बाब्वेने उडवला पाकिस्तानचा धुव्वा, पहिल्याच वनडे सामन्यावर वर्चस्व!
IPL Mega Auction; मुंबई इंडियन्स नाही, तर ‘या’ संघाकडून खेळणार इशान किशन!
व्यंकटेश अय्यरवर लिलावात लागली 23.75 कोटींची बोली, ‘या’ संघातून खेळताना दिसणार