कसोटी क्रिकेट (Test Cricket) हा क्रिकेटचा सर्वात जुना आणि पारंपरिक प्रकार आहे. कसोटी क्रिकेटमध्ये खेळाडूंची खरी परीक्षा होते, असे म्हणतात. या क्रिकेट प्रकाराची सुरुवात 1877 मध्ये झाली होती. काळासोबत यामध्ये अनेक बदल झाले, पण आजही हा क्रिकेटचा सर्वात कठीण प्रकार आहे. एकदिवसीय आणि टी20 क्रिकेटमुळे कसोटी सामने खेळण्याचे प्रमाण नक्कीच कमी झाले आहे. मात्र, चाहत्यांना आजही हा प्रकार आवडतो. कसोटी क्रिकेटमध्ये आतापर्यंत खेळाडूंनी एकापेक्षा एक अप्रतिम प्रदर्शन केले आहे.
कसोटी क्रिकेटमध्ये फलंदाजांसाठी धावा करणे कठीण असते, पण तरीही काही खेळाडू आहेत, ज्यांनी कसोटी क्रिकेटमध्ये फलंदाजीचे अनेक विक्रम केले आहेत. ब्रायन लाराने क्रिकेटच्या या प्रकारात वैयक्तित 400 धावांची खेळी केली आहे. तसेच इतरही दिग्गज फलंदाज होऊन गेले आहेत. मात्र, दुसरीकडे कसोटी क्रिकेटमध्ये काही खेळाडू असेही आहेत त्यांनी स्वतःच्या नावावर नकोसे विक्रम नोंदवले आहेत. काही खेळाडू आहेत, जे अनेकदा स्वस्तात बाद झाले आहेत. आपण या लेखात अशा तीन खेळाडूंचा उल्लेख करणार आहोत, जे कसोटी कारकिर्दीत सर्वाधिक वेळा एक आकडी धावसंख्येवर बाद झाले आहेत.
तीन खेळाडू जे कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा एक आकडी धावसंख्येवर बाद झाले.
1. कर्टनी वॉल्श, वेस्ट इंडीज (99)
कर्टनी वॉल्श वेस्ट इंडीज संघाचे एक महान गोलंदाज होते. त्यांनी आपल्या कारकिर्दीच्या काळात विरोधी संघाच्या चांगल्या-चांगल्या फलंदाजांना गती आणि स्विंगच्या जोरावर धूळ चारली आहे. वॉल्श यांनी गोलंदाजीत अनेक कसोटी विक्रम केले आहेत. मात्र, फलंदाजीत एक नकोसा विक्रम देखील स्वतःच्या नावावर आहे. त्यांच्या कारकिर्दीत ते अनेकदा स्वस्तात बाद झाले आहेत. कसोटी कारकिर्दीत खेळलेल्या 132 सामन्यांमधील 185 डावांत 99 वेळा ते एक आकडी धावसंख्येवर बाद झाले होते.
2. स्टुअर्ट ब्रॉड, इंग्लंड (110) –
स्टुअर्ट ब्रॉड इंग्लंड संघाचा एक दिग्गज गोलंदाज आहे आणि कसोटी क्रिकेटमध्ये त्याने गोलंदाजीचे अनेक विक्रम स्वतःच्या नावावर केले आहेत. त्याने गोलंदाजीसह फलंदाजीमध्ये अनेकदा महत्वपूर्ण प्रदर्शन करून दाखवले आहे. परंतु यादरम्यान फलंदाजी करताना तो अनेकदा 10 पेक्षा कमी धावसंख्येवर बाद झाला आहे. ब्रॉड इंग्लंड संघासाठी आतापर्यंत 159 कसोटी सामने खेळला आहे आणि यामधील 293 डावांत तो 110 वेळा एक आकडी धावसंख्येवर बाद झाला आहे.
1. जेम्स अँडरसन, इंग्लंड (113) –
इंग्लंड संघाचा महान वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. तो कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा वेगवान गोलंदाज आहे. कसोटी क्रिकेटमध्ये तो ज्या ठिकाणी पोहोचला आहे, त्याठिकाणी इतर कोणताच गोलंदाज पोहोचू शकला नाही. असे असले तरी, त्याच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये एक नकोसा विक्रम देखील आहे. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा एक आकडी धावसंख्येवर बाद होणारा खेळाडू ठरला आहे. तो आतापर्यंत 177 सामन्यांतील 329 डावांमध्ये 113 वेळा 10 पेक्षा कमी धावसंख्येवर बाद झाला आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
FIFA क्रमवारीनुसार ब्राझील पहिल्या स्थानावर, तर चॅम्पियन अर्जेंटिना…
मैदानाबाहेरही मेस्सीचा बलाढ्य विक्रम! रोनाल्डोलाही करता नाही आली ‘अशी’ कामगिरी