भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मानं विश्वचषक जिंकल्यानंतर टी20 क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. रोहितनं सामन्यानंतरच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं की, हा त्याचा शेवटचा टी20 आंतरराष्ट्रीय सामना होता. रोहितनं अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे सर्वच जण हैराण आहेत. मात्र भविष्याचा विचार करून त्यानं हा निर्णय घेतला आहे.
आता सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो की, भारतीय संघाचा पुढील कर्णधार कोण असेल? टीम इंडियाच्या कर्णधार पदासाठी अनेक दावेदार आहेत. चला तर मग, या बातमीद्वारे आम्ही तुम्हाला अशा 3 प्रमुख दावेदारांबद्दल सांगणार आहोत.
(1) हार्दिक पांड्या – रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर अष्टपैलू हार्दिक पांड्या कर्णधार बनण्याच्या शर्यतीत सर्वात आघाडीवर आहे. तो या टी20 विश्वचषकात भारतीय संघाचा उपकर्णधार होता. त्यामुळे तो या पदासाठी नैसर्गिक दावेदार आहे. हार्दिकनं त्याच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्सला आयपीएल चॅम्पियन बनवलं होतं. त्यामुळे देखील त्याची दावेदारी मजबूत आहे. हार्दिक पांड्याकडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा मोठा अनुभव असून तो भारतीय संघाचा नियमित सदस्य आहे.
(2) जसप्रीत बुमराह – भारताचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह देखील या पदासाठी मोठा दावेदार आहे. बुमराह भारतीय गोलंदाजीचा लीडर असून त्यानं अनेक वेळा महत्त्वाच्या सामन्यांमध्ये आपल्या गोलंदाजीनं टीम इंडियाला विजय मिळवून दिला आहे. गेल्या काही वर्षांपासून बुमराहच्या कामगिरीत सातत्य दिसलं असून त्याचा स्वभाव देखील शांत आहे, जे त्याला या पदासाठी योग्य उमेदवार बनवतं.
(3) रिषभ पंत – भारतीय संघाचा पुढील कर्णधार म्हणून यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतचं नाव देखील समोर येत आहे. यामागचं सर्वात मोठं कारण म्हणजे, रिषभ आयपीएलमध्ये गेल्या 2 हंगामांपासून दिल्ली कॅपिटल्सचं नेतृत्व करतोय. 26 वर्षीय रिषभ फलंदाजीत काय कमाल करू शकतो, हे सर्वांना माहित आहे. मात्र आयपीएलमध्ये देखील त्यानं आपल्या नेतृत्वगुणांनी सर्वांची मनं जिंकली आहेत. रिषभ सध्या केवळ 26 वर्षाचा आहे. त्यामुळे भविष्याकडे पाहता, तो कर्णधारपदासाठी योग्य उमेदवार राहू शकतो.
महत्त्वाच्या बातम्या –
टीम इंडियाच्या विजयानंतर ढसाढसा रडला इरफान पठाण; म्हणाला, “मागील दहा दिवस…”
भारतीय टी20 क्रिकेटमधून ‘रोहित-विराट’ युगाचा अंत, विश्वचषक जिंकून घेतला निरोप
“कहीं खुशी कहीं गम” रितिकाचा विश्वविजेता कर्णधार रोहितवर प्रेमाचा वर्षाव, तर मिलरच्या पत्नीनं सावरलं