भारताचा दिग्गज फलंदाज रोहित शर्मासाठी सध्या काहीही बरोबर चाललेलं नाही. सिडनीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध शेवटच्या कसोटी सामन्यासाठी त्याला संघातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. यानंतर आता त्याच्या एकदिवसीय संघातील स्थानावरही धोका निर्माण झाला आहे. इंग्लंडचा संघ या महिन्यात मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी भारत दौऱ्यावर येणार आहे. या मालिकेसाठी रोहितला विश्रांती दिली जाणार असल्याचा दावा काही रिपोर्ट्समध्ये केला जातोय. चला तर मग, या बातमीद्वारे आपण अशा तीन फलंदाजांबद्दल जाणून घेऊया, जे या मालिकेत रोहित शर्माची जागा घेऊ शकतात.
(3) ऋतुराज गायकवाड – उजव्या हाताचा फलंदाज ऋतुराज गायकवाड सलामीला खेळतो. तो सध्या भारतीय संघात आपलं स्थान पक्कं करण्याच्या प्रयत्नात आहे. ऋतुराजनं आतापर्यंत भारतासाठी सहा एकदिवसीय सामने खेळले आहेत. तो आयपीएलमध्ये नियमित खेळत असला, तरी भारतीय संघातील त्याचं स्थान अद्याप निश्चित झालेलं नाही. जर रोहित ही मालिका खेळला नाही, तर ऋतुराज त्याची जागा घेऊ शकतो. ही संधी त्याच्या कारकिर्दीचा टर्निंग पॉइंट देखील ठरू शकते.
(2) साई सुदर्शन – भारताचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांना डाव्या आणि उजव्या हाताची सलामीची जोडी बनवायची असेल, तर त्यांच्याकडे साई सुदर्शनच्या रूपात एक चांगला पर्याय आहे. 23 वर्षीय साईनं 2023 मध्ये दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. तो टॉप ऑर्डरमध्ये फलंदाजीसाठी ओळखला जातो. गेल्या काही काळापासून देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याच्या बॅटमधून सातत्यानं धावा येत आहेत. सलामीसाठी तो एक चांगला पर्याय ठरू शकतो.
(1) यशस्वी जयस्वाल – यशस्वी जयस्वालनं कसोटी आणि टी20 क्रिकेटमध्ये सलामीला आपलं स्थान निश्चित केलं आहे. आता त्याला फक्त एकदिवसीय सामन्यात संधी मिळणं बाकी आहे. इंग्लंडविरुद्धची ही मायदेशातील एकदिवसीय मालिका यशस्वीच्या वनडे पदार्पणासाठी योग्य संधी असू शकते. जयस्वाल कसोटीत शुबमन गिलसोबत सतत क्रिकेट खेळत आहे. त्यामुळे त्याच्यासोबत वनडेमध्ये डावाची सुरुवात करणं त्याच्यासाठी सोपं जाईल.
हेही वाचा –
करुण नायरचा अनोखा रेकॉर्ड, लिस्ट ए क्रिकेटमध्ये आऊट न होता केल्या इतक्या धावा
मुंबई इंडियन्सच्या स्टार खेळाडू पाकिस्तानसमोर दाखवला दम, ठोकले झंझावाती शतक
रोहित शर्माला ड्रॉप केल्यामुळे भावूक झाला रिषभ पंत; म्हणाला, “हा असा निर्णय…”