क्रिकेटच्या कोणत्याही प्रकारात कर्णधाराची भूमिका अतिशय महत्त्वाची असते. कर्णधारच असतो की जो पुढे होऊन संघाचं नेतृत्व करत असतो.
त्याच्यावर मैदानाच्या आत आणि बाहेर संघाला लीड करण्याची जबाबदारी असते. जेव्हा कधी संघ कोणती मोठी मालिका किंवा विजेतेपद जिंकतो. तेव्हा त्याचे श्रेय कर्णधाराला दिलं जातं किंवा संघ जेव्हा हारतो तेव्हाही कर्णधारावरच प्रश्न उपस्थित केले जातात.
काही खेळाडू असतात. जे कर्णधाराच्या भूमिकेत अतिशय सुरेख प्रदर्शन करतात. सौरव गांगुली, रिकी पॉटिंग, एमएस धोनी, ग्रॅम स्मिथ या सर्वांनी कर्णधार म्हणून यशाचं शिखर गाठलं आहे. जेव्हा एखादा खेळाडू कर्णधार म्हणून लागोपाठ चांगलं प्रदर्शन करताना दिसला की त्याला बराच काळ संघाचं नेतृत्व करण्याची संधी मिळते.
आज आपण या लेखात सर्वात जास्त वनडे सामन्यांत कर्णधार म्हणून खेळलेल्या त्या ३ खेळाडूंबद्दल बोलणार आहोत.
३ – एमएस धोनी
एमएस धोनी(MS Dhoni) हा भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार आहे. त्याच्या नेतृत्वात भारताने ३ आयसीसी विजेतेपद आपल्या नावी केली आहेत. धोनीच्या नेतृत्वात भारताने पहिल्यांदा २००७ टी२० विश्वचषक आपल्या नावी केला. त्यानंतर २८ वर्षांनंतर २०११ साली वनडे विश्वचषक जिंकला. आणि शेवटी २०१३ मध्ये इंग्लंडला हारवून चॅम्पियन ट्रॉफीवर आपलं नाव सुवर्णक्षरात कोरलं होतं.
धोनीच्या नेतृत्वात भारताने अनेक स्पर्धा आणि मालिकांमध्ये विजय मिळवले आहेत. त्यामुळे तो भारताचा एक सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून ओळखला जातो. त्याने २००७ ते २०१८ या काळात कर्णधार असताना २०० वनडे सामने खेळले आहेत. ज्यामध्ये संघाने ११० सामन्यांत विजय आणि ७४ सामन्यांत पराजय स्वीकारले आहेत. त्यामुळे तो या यादीत तिसऱ्या क्रमांकावर विराजमान आहे.
२ – स्टीफन फ्लेमिंग
न्यूझीलंडचा माजी कर्णधार स्टीफन फ्लेमिंग(Stifan Fleming) या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहेत. स्टीफन यांना त्याच्या काळातील एक जबरदस्त कर्णधार म्हणून ओळखले जात होते. आणि स्वतःच्या दमावर त्यांनी संघाला मिळवून देत संघाला पुढे घेऊन गेले.
स्टीफन यांनी १९९७ ते २००७ पर्यंत संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी सांभाळली. या दरम्यान त्यांनी २१८ सामन्यांत संघाचं नेतृत्व केलं.यामध्ये त्यांना संघाला ९८ विजय मिळवून देत आले. तर १०६ सामन्यांत पराभवाला सामोरं जावं लागलं.
१ – रिकी पॉटिंग
रिकी पॉटिंग(Ricky Ponting) यांना ऑस्ट्रेलियाचा एक यशस्वी कर्णधार म्हणून ओळखले जाते. त्यामुळे ते या यादीत पहिल्या क्रमांकावर आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने दोन वेळा(२००३ आणि २००७) वनडे विश्वचषक विजेतेपद जिंकलं आहे.
म्हटलं जातं की पॉटिंगच्या नेतृत्वातील जो ऑस्ट्रेलिया संघ होता, तो अजिंक्य होता आणि त्याला कोणीही पराभूत करू शकत नव्हते. त्याचे आकडेही या गोष्टीला पाठींबा देतात.
पॉटिंगने २००२ ते २०१२ पर्यंत २३० वनडे सामन्यांत ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व केले आहे. ज्यामध्ये त्याने तब्बल १६५ सामन्यांत कांगारूंना विजय मिळवून दिले. तर सामन्यांत त्यांना 51 पराजयचा सामना करावा लागला.