---Advertisement---

IPL : पंजाबकडून शतक करणारे ३ खेळाडू, जे आज कोणाच्या लक्षातही नाहीत

On: बुधवार, ऑक्टोबर 14, 2020 7:17 AM
---Advertisement---

क्रिकेट प्रकार कोणताही असो, त्यात शतक करणे सोपी गोष्ट नाही. मग त्याला आयपीएलतरी अपवाद कसा असेल. आयपीएलमध्येही शतक ठोकणे इतके सोपे नाही, परंतु आतापर्यंतचा इतिहास पाहता या स्पर्धेत अनेक दिग्गज खेळाडूंनी उत्कृष्ट आणि तुफानी खेळी करून शतके ठोकली आहेत. शतक ठोकणार्‍या प्रत्येक खेळाडूंची नावे आयपीएलच्या इतिहासात कायमची नोंदली गेली आहेत आणि लोकांच्या आठवणींमध्ये हे खेळाडू कायमचे राहातातच, पण काही खेळाडू काळाच्या ओघास विसलेही जातात.

या लेखाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला अशा तीन खेळाडूंबद्दल सांगणार आहोत ज्यांनी किंग्स इलेव्हन पंजाब संघाकडून अशी शतके ठोकली आहेत, ज्यांना कदाचित चाहते विसरले असतील.

३. पॉल वॉल्थटी

आयपीएलच्या इतिहासात शानदार शतक ठोकणार्‍या खेळाडूंमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबच्या पॉल वॉल्थटी या फलंदाजाचेही नाव अभिमानाने घेतले जाते. त्याने २०११ मध्ये, चेन्नई सुपर किंग्ज विरूद्ध, जबरदस्त शतकी खेळी केली होती आणि त्याने आपल्या संघाला विजय मिळवून दिला होता. वास्तविक या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने प्रथम फलंदाजी करताना पंजाब संघाला १८९ धावांचे लक्ष्य दिले होते. त्याला उत्तर देताना किंग्ज इलेव्हन पंजाबचा सलामीवीर पॉल वॉल्थटीने अवघ्या ६३ चेंडूत १२० धावा केल्या. ज्यामध्ये त्याने १९ चौकार ठोकले आणि २ षटकारही ठोकले. या खेळीमुळे त्याच्या संघाने ५ चेंडू शिल्लक ठेवून हे लक्ष्य गाठले. तथापि, आजच्या काळात, बहुतेक लोक या खेळाडूचे नाव विसरले आहेत.

२. हाशिम आमला

हाशिम अमलाचे नाव म्हणजे कसोटी क्रिकेटपटू म्हणून बर्‍याच लोकांना माहित आहे. पण आमला टी-२० क्रिकेटमधील एक उत्तम खेळाडू देखील होता. २०१७ मध्ये खेळल्या गेलेल्या इंडियन प्रीमियर लीग हंगामातही त्याने शतक झळकावले आहे. आयपीएल २०१७ मध्ये मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यादरम्यान हाशिम अमलाने १०४ धावांची नाबाद खेळी खेळली. ज्यामध्ये त्याने ६० चेंडूत ६ षटकार आणि ८ चौकार ठोकले. मात्र, त्याचा संघ किंग्ज इलेव्हन पंजाबने हा सामना गमावला.

१. शॉन मार्श

आयपीएलच्या सुरुवातीच्या हंगामात किंग्ज इलेव्हन पंजाबचा भाग असणारा शॉन मार्श या खेळाडूला कदाचित आता चाहते विसरले असणार, पण या खेळाडूने आयपीएलच्या उद्घाटनाच्या हंगामात म्हणजेत २००८ च्या हंगामात जबरदस्त शतक झळकावले आणि वैयक्तिक सर्वाधिक धावाही केल्या होत्या. शॉन मार्शने त्या हंगामात ऑरेंज कॅप जिंकली. शॉन मार्शने पहिल्या हंगामातील चॅम्पियन संघ राजस्थान रॉयल्सविरुद्ध ६९ चेंडूत ११५ धावांची शानदार खेळी केली होती. ज्यामध्ये त्याने ११ चौकार आणि ७ षटकार लगावले. त्याच्या खेळीमुळे पंजाबने राजस्थानला २२२ धावांचे लक्ष्य दिले आणि पंजाबने हा सामना ४१ धावांनी सामना जिंकला होता.

महत्त्वाच्या बातम्या-

मै अब बच्चा नहीं रहा..! हैदराबाद विरुद्ध ओपनिंग करणे सॅम करन पडले महागात

चेन्नई एक्सप्रेस पुन्हा रुळावर, हैदराबाद विरुद्धच्या विजयासह गुणतालिकेत आली ‘या’ स्थानावर

IPL 2020 : ऑरेंज आणि पर्पल कॅपचा विजेतेपदाची स्पर्धा वाढली, बुमराहसाठी अवघड आहे…

ट्रेंडिंग लेख-

एकेकाळी क्रिकेटचं मैदान गाजवलेला विराटचा मित्र बिहारच्या राजकारणात ठरतोय ‘किंग’

आयपीएल २०२०: चेन्नईच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश असावा ‘असे’ ३ खेळाडू

स्वार्थी राजकारणामुळे देशाने गमावलेला अस्सल हिरा.! ७० व्या वर्षापर्यंत क्रिकेट खेळलेले एकमेव खेळाडू

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---