आजकाल भारतात क्रिकेट खेळणाऱ्या प्रत्येक युवा खेळाडूचे स्वप्न असते की त्याला इंडियन प्रीमीयर लीगमध्ये खेळायचे असते. अनेक युवा खेळाडूंना ही संधी मिळतेही. असेच सोमवारी (१२ एप्रिल) २३ वर्षीय चेतन सकारिया या युवा खेळाडूचे स्वप्न पुर्ण झाले. देशांतर्गत क्रिकेटमध्ये सौराष्ट्र संघाकडून खेळणारा चेतनने पंजाब किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्सकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले.
त्याने पदार्पणातच सर्वांना प्रभावितही केले. त्याने या सामन्यांत ३१ धावा देत ३ विकेट्स घेतल्या. तसेच त्याने निकोलस पूरनचाही एक अप्रतिम झेल घेतला. त्याला या सामन्यात खेळताना पाहिल्यानंतर अनेकांनी तो भारतीय क्रिकेटचे भविष्य असल्याचे म्हटले आहे. कारण त्याची देशांतर्गत क्रिकेटमधील कामगिरीही चांगली झाली आहे.
त्याने १५ प्रथम श्रेणीचे सामने खेळताना ४१ विकेट्स घेतल्या आहेत. तसेच त्याने ७ अ दर्जाच्या सामन्यांत १० विकेट्स आणि १६ टी२० सामन्यांत २८ विकेट्स घेतल्या आहेत.
या लेखात आपण अशी ३ कारणे जाणून घेऊ ज्यामुळे सकारियाला भारतीय क्रिकेटमधील भविष्यातील तारा संबोधले जाऊ शकते.
१. चेतन सकारिया हा डावखुरा गोलंदाज आहे. हीच गोष्ट त्याच्या फायद्याची आहे. भारतीय संघात तो डावखुऱ्या वेगवान गोलंदाजाची भूमिका बजावू शकतो. झहीर खान आणि आशिष नेहरा यांच्या नंतर ही कमतरता भारतीय संघाला अनेकदा भासते. त्यामुळे लवकरच तो निवड समितीचे लक्ष वेधून घेऊ शकतो.
२. चेतन सकारिया याच्याकडे डावाच्या शेवटच्या षटकांमध्ये गोलंदाजी करण्याची चांगली क्षमता आहे. राजस्थान रॉयल्स संघाकडून त्याने चांगली कामगिरी केली. जेव्हा पंजाबच्या संघाने २२१ धावांचा डोंगर उभा केला होता, तेव्हा चेतन सकारियाने केवळ ३१ धावांमध्ये तीन फलंदाजांना बाद केले होते. यात
३. चेतन सकारियाने देशांतर्गत क्रिकेटमध्येपण चांगली कामगिरी केली आहे. काही महिन्यापूर्वी झालेल्या सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत देखील तो चमकला होता. ५ सामन्यांमध्ये त्याने १२ बळी मिळवण्याची कामगिरी केली होती.
महत्त्वाच्या बातम्या –
राजस्थान विरुद्ध पंजाब यांच्यातील चालू सामन्यात अचानक चेंडू झाला निळा, ‘हे’ होते कारण
“मला विश्वास आहे, तो नक्की पुनरागमन करेल”, कुलदीप यादवच्या मदतीला धावला भारतीय दिग्गज