---Advertisement---

राजस्थान विरुद्ध पंजाब यांच्यातील चालू सामन्यात अचानक चेंडू झाला निळा, ‘हे’ होते कारण

On: मंगळवार, एप्रिल 13, 2021 6:19 PM
---Advertisement---

सोमवारी (१२ एप्रिल) मुंबई येथे राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यात झालेला आयपीएल २०२१ चा चौथा सामना अतिशय उत्कंठावर्धक ठरला. अटीतटीच्या झालेल्या या सामन्यात पंजाबने अखेरच्या चेंडूवर ४ धावांनी विजय मिळवला. मात्र, या सामन्यात एक अजब घटना पाहायला मिळाली. राजस्थानच्या डावादरम्यान चेंडू काहीसा निळसर झाल्याचे निदर्शनास आले. याविषयी अनेक तर्कवितर्क लावले जात होते. चेंडू निळा कसा झाला याबाबत आता उलगडा झाला आहे.

चेंडू झाला निळा
पंजाब किंग्सने तुफान फटकेबाजी करत राजस्थानसमोर २२२ धावांचे लक्ष्य ठेवले. प्रत्युत्तरात राजस्थानने खराब सुरुवात केली. डावाच्या आठव्या षटकात आपला पहिला सामना खेळणाऱ्या झाय रिचर्डसनने जोस बटलरचा त्रिफळा उडवला. बटलर बाद झाल्यानंतर, जेव्हा त्याचा रिप्ले दाखविला गेला, त्या रिप्लेमध्ये चेंडू काहीसा निळसर झालेला दिसून आला. चेंडू निळा कसा काय झाला? याबाबत सोशल मीडियावरून विचारले जाऊ लागले.

…म्हणून चेंडू निळा झाला
चेंडूचा काही भाग अचानक निळा झाल्याने चर्चेला उधाण आले. मात्र, सामन्यानंतर असे समजले की, सीमारेषेबाहेरील एका बोर्डचा रंग सुकला नव्हता. राजस्थानच्या डावाच्या सातव्या षटकात मुरुगन अश्विनच्या गोलंदाजीवर मिळालेल्या फ्री हिटवर जोस बटलरने मारलेला वेगवान चौकार त्या बोर्डला धडकला आणि तो रंग चेंडूला लागला.

https://twitter.com/CricSidd/status/1381656183065305088

पंजाबचा रोमहर्षक विजय
पंजाब किंग्सने प्रथम फलंदाजी करताना कर्णधार केएल राहुलच्या ९१ व अष्टपैलू दीपक हूडाच्या ६४ धावांच्या जोरावर २२१ धावांची मजल मारली. राजस्थानसाठी पदार्पण करणाऱ्या चेतन सकारियाने सर्वाधिक तीन बळी मिळविले.

प्रत्युत्तरात, खराब सुरुवातीनंतर कर्णधार संजू सॅमसनने शतक ठोकत एकहाती संघाची धुरा वाहिली. जोस बटलर (२५), शिवम दुबे (२३) व रियान पराग (२५) यांनी त्याला साथ दिली. अखेरच्या चेंडूवर विजयासाठी ५ धावांची आवश्यकता असताना तो वैयक्तिक ११९ धावांवर बाद झाला. सामनावीर म्हणून संजू सॅमसनची निवड करण्यात आली.

महत्त्वाच्या बातम्या –

‘तेव्हा रिचर्डसन मला शाळकरी मुलासारखा वाटला होता’, भारतीय दिग्गजाने सांगितली मजेशीर आठवण

चार वर्षांपूर्वी कॅनडाला जाण्यास नकार दिलेल्या २२ वर्षीय अर्शदीपने राजस्थानला पाजले पराभवाचे पाणी, वाचा त्याची कहाणी

राजस्थानविरुद्ध शेवटचे षटक टाकणाऱ्या अर्शदीपने सांगितले संजू सॅमसन विरुद्ध होता ‘हा’ प्लॅन

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---