आयपीएल 2025ची क्रिकेटप्रेमींना नक्कीच उत्सुकता लागली असेल. दरम्यान आज (20 जानेवारी) लखनऊ सुपर जायंट्सने (Lucknow Super Giants) आपल्या नवीन कर्णधाराची घोषणा केली. मालक संजीव गोयंका (Sanjiv Goenka) यांनी पत्रकार परिषदेत नवा कर्णधार म्हणून डावखुरा/यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतची (Rishabh Pant) निवड केली. आगामी आयपीएल हंगामात पंत आता लखनऊच्या कर्णधारपदाची सूत्रे हाती घेईल. चला तर मग जाणून घेऊया, की पंतला कोणत्या 3 कारणांमुळे लखनऊचा कर्णधार बनवण्यात आले.
1) एक जबाबदार यष्टीरक्षक फलंदाज- आयपीएलपासून ते भारतीय संघापर्यंत रिषभ पंत (Rishabh Pant) एक हुशार यष्टीरक्षक फलंदाज म्हणून ओळखला जातो. 2016ला आयपीएलमध्ये पदार्पण केल्यापासून, त्याने दिल्ली कॅपिटल्ससाठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्याने आतापर्यंत या लीगमध्ये 111 सामन्यांमध्ये 35 पेक्षा जास्त सरासरीने 3,284 धावा केल्या आहेत. यष्टीरक्षक म्हणून त्याने 75 झेलसह 23 स्टंपिंगही केल्या आहेत.
2) भारतीय संघाच्या नेतृत्वाचा भाग- पंत आता भारतीय क्रिकेट संघात एक अतिशय शानदार खेळाडू बनला आहे. तो संघात एक मोठा सामना जिंकणारा खेळाडू बनला आहे. एवढेच नाही तर आता भारताचा भावी कर्णधार म्हणून देखील त्याचे नाव चर्चेत असते. जिथे त्याला सध्या नेतृत्वाचा भाग मानले जाते.
3) आयपीएलमध्ये कर्णधारपदाचा अनुभव- आयपीएलच्या सुरुवातीपासूनच रिषभ पंत (Rishabh Pant) दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघात खेळत होता. त्याने या संघाचे नेतृत्व देखील केले आहे. 2021 मध्ये श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) जखमी झाल्यावर पंतला नवा कर्णधार बनवण्यात आले. यानंतर, त्याला 3 हंगाम दिल्लीचे नेतृत्व करण्याचा अनुभव मिळाला. आतापर्यंत, त्याने आयपीएलमध्ये एकूण 43 सामन्यांत नेतृत्व केले आहे. दरम्यान त्याने 23 सामन्यात विजय मिळवला आहे.
रिषभ पंतच्या आयपीएल कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले, तर त्याने आयपीएलमध्ये आतापर्यंत 111 सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्याने 35.31च्या सरासरीने 3,284 धावा केल्या आहेत. दरम्यान त्याचा स्ट्राईक रेट 148.93 आहे. आयपीएलमध्ये पंतने 18 अर्धशतकांसह 1 शतक झळकावले आहे, त्याची सर्वोच्च धावसंख्या नाबाद 128 आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
IPL 2025; LSGचा कर्णधार झाल्यानंतर रिषभ पंतला आली धोनीची आठवण! म्हणाला…
IPL 2025; लखनऊ सुपर जायंट्सला मिळाला नवा कर्णधार, संघ मालकाची मोठी घोषणा
या तारखेपर्यंत चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियामध्ये बदल शक्य, या खेळाडूंना अजूनही संधी?