जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंड संघाने भारतीय संघाचा ८ विकेट्सने पराभव केला. या विजयासह न्यूझीलंड संघ हा जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा पहिलावहिला विजेता बनला. या ऐतिहासिक सामन्यात भारतीय संघाच्या हारकिरीनंतर अनेक खेळाडूंच्या स्थानाबदल चर्चा होत आहे. त्यात एक नाव म्हणजे भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज शुभमन गिल याचे. न्यूझीलंडच्या गोलंदाजांपुढे या युवा खेळाडूचा टिका लागला नाही. तो दोन्हीही डावात सपशेल फ्लॉप ठरला. यानंतर त्याचे सलामीचा स्थान धोक्यात आले आहे.
गिलची कामगिरी काही काळापासून खराब चालू आहे. त्याला ऑस्ट्रेलिया दौरा वगळता भारतात झालेल्या इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेत व आता अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात मोठी खेळी खेळता आली नाही. इंग्लंडविरुद्धच्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत त्याने सात डावांमध्ये फक्त ११९ धावा केल्या होत्या. तर जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात गिलला त्याला दोन्ही डावात मिळून फक्त ३६ धावा करता आल्या.
अशा परिस्थितीत अंतिम ११ मध्ये गिलऐवजी इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या मयंक अग्रवालला संधी दिली पाहिजे. त्याला ऑस्ट्रेलियामध्ये दोन सामन्यांनंतर वगळण्यात आले होते. परंतु तो अनेक अर्थांनी इंग्लंडविरुद्ध दमदार कामगिरी करण्यास पात्र आहे. या लेखात आम्ही आगामी कसोटी मालिकेत गिलऐवजी मयंक अग्रवाल याला संधी का दिली पाहिजे? यामागील तीन कारणांचा उल्लेख करणार आहोत.
१. मयंक अग्रवालने कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत जबरदस्त कामगिरी केली
मयंक अग्रवालने कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या साखली फेरी सामन्यांमध्ये सुंदर फलंदाजी केली आहे. या कारणास्तव, स्पर्धेचा अंत झाल्यानंतर तो या स्पर्धेत भारतासाठी सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत चौथ्या स्थानावर आहे. अग्रवालने २० डावात ४२.८५ च्या सरासरीने ८५७ धावा केल्या आहेत. दुसरीकडे गिलने ८ सामन्यांत ३१. ८५ च्या सरासरीने ४१४ धावा केल्या आहेत. अशा परिस्थितीत अग्रवालची फलंदाजीची चांगली सरासरी त्याची क्षमता स्पष्टपणे दाखवते आणि गिलऐवजी संधी मिळण्यासाठी त्याला पात्रही बनवते.
२. अग्रवालची आयपीएलमधील चांगली कामगिरी
मयंकने आयपीएल २०२१ मध्ये उत्कृष्ट प्रदर्शन केले आहे आणि त्यांनी आपल्या संघासाठी जोरदार फलंदाजी केली आहे. मयंकने या मोसमात ७ सामन्यांमध्ये १४१.३० स्ट्राइक रेटने २६० धावा केल्या आणि यादरम्यान त्याची सर्वाधिक धावसंख्या ९९ होती. यावरून त्याचा सध्याची कामगिरी कळून येते. त्याचवेळी, गिलचा आयपीएलमध्ये खराब फॉर्म होता आणि त्यामुळे अंतिम सामन्यात भारतीय संघाला या गोष्टीची किंमत मोजावी लागली.
३. अग्रवाल गिलपेक्षा पटकन आणि सावधगिरीने धावा काढण्यात चांगला
मयंक अग्रवाल हा असा एक फलंदाज आहे, ज्याच्यात जेव्हा आवश्यक असेल तेव्हा डाव हाताळताना सातत्याने धावा करण्याची क्षमता आहे आणि त्याच्याकडे स्विंग चेंडू खेळण्याचीही क्षमता देखील आहे. तो बर्याच दिवसांपासून सलामीला खेळत आहे. त्याने गिलपेक्षा चांगली खेळी केली आहे. अग्रवाल खेळपट्टीवर जास्त काळ टिकून राहतो, तो धावा करण्याचा प्रयत्न करत राहतो आणि इंग्लंडमध्ये ही खूप महत्वाची गोष्ट आहे.
महत्वाच्या बातम्या
पराभवाचं दु:ख विसरुन भारतीय क्रिकेटर जाणार सुट्टीवर, विम्बल्डन-युरो चषकाचा घेतील आनंद!
WTC फायनल पराभवातून भारताला मिळाला धडा, कसोटी मालिकेपुर्वी ईसीबीला केली ‘ही’ विनंती