व्हिव्हिएस लक्ष्मण हा एक असा क्रिकेटपटू होता, जो ऑस्ट्रेलिया संघाला त्यावेळी त्रास देत असे जेव्हा जगातील बरेचशे फलंदाज ऑस्ट्रेलियासमोर नांगी टाकत असे. वनडे असो किंवा कसोटी, लक्ष्मणचा खेळ ऑस्ट्रेलियाविरुद्ध कायमच बहरायचा.
त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध अशी कामगिरी करणारा फलंदाज जर कोण असेल तर अर्थातच भारतीय वनडे संघाचा उपकर्णधार रोहित शर्मा. रोहितनेही अनेक वेळा ऑस्ट्रेलियाविरुद्ध व्हेरी व्हेरी स्पेशल खेळी केल्या आहेत. 3 records smashed by Rohit Sharma against Australia.
या लेखात त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध केलेले काही खास विक्रम-
३. आस्ट्रेलियात वनडे सर्वाधिक नाबाद धावा
रोहित शर्माने २०१६मध्ये ऑस्ट्रेलियामध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध नाबाद १७१ धावांची खेळी केली होती. ही खेळीत ऑस्ट्रेलियात कोणत्याही खेळाडूने वनडेत केलेल्या नाबाद खेळीपेक्षा मोठी आहे. अगदी ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनाही हा कारनामा जमलेला नाही. यापुर्वी हा विक्रम एबी डिविलियर्सच्या नावावर होता. त्याने नाबाद १६२ धावांची खेळी वेस्ट इंडिजविरुद्ध २०१५ विश्वचषकात केली होती तर २०१५ विश्वचषकातच ख्रिस गेलने २१५ धावांची खेळी झिंबाब्वे संघाविरुद्ध केली होती. परंतु तो बाद झाला होता.
२. ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडेत सर्वाधिक षटकार
रोहितने ऑस्ट्रेलिया देशात तब्बल वनडेत ३४ षटकार मारले आहेत. परंतु ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक वनडे षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीतही तो अव्वल स्थानी आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४० वनडेत रोहितने ७६ षटकार मारले आहेत. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर ४७ षटकारांसह ऑयन माॅर्गन तर ३५ षटकारांसह सचिन तेंडूलकर आहे.
१. ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडेत सर्वाधिक धावा
ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडेत सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत रोहित तिसऱ्या स्थानावर आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरने ७१ सामन्यात ३०७७, डेसमंड हायन्स यांनी ६४ सामन्यात २२६२ तर रोहितने ४० सामन्यात २२०८ धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडेत सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होण्यासाठी त्याला आता ७६९ धावांची गरज आहे.
ट्रेंडिंग घडामोडी-
-कपिल देव यांना पैशांची गरज नाही, पण बाकी लोकांना आहे
-वनडेत सर्वाधिक शतके करणारे ५ कर्णधार, दोन नावं आहेत आश्चर्यचकित करणारी
-कसोटीत कर्णधार असताना सर्वाधिक शतके करणारे ५ खेळाडू