---Advertisement---

IPL 2025: प्लेऑफपूर्वी RCB-MI चे वाढणार टेन्शन..! 3 स्टार खेळाडू होणार बाहेर?

On: मंगळवार, मे 13, 2025 9:56 PM
---Advertisement---

भारत-पाकिस्तानमधील सीमा तणावामुळे आयपीएल 2025 एका आठवड्यासाठी थांबवण्यात आले होते. मात्र, आता ही स्पर्धा पुन्हा सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आयपीएल 2025 (17 मे) पासून सुरू होत आहे. पण, आयपीएल 2025 पुन्हा सुरू होताच, 3 स्टार खेळाडू त्यांचे फ्रँचायझी सोडणार आहेत. हे तिन्ही खेळाडू इंग्लंडचे आहेत. जोस बटलर (Jos Buttler) गुजरात टायटन्ससाठी सहभागी होऊ शकणार नाही, तर जेकब बेथेल (Jacob Bethell) देखील आरसीबी सोडणार आहे. याशिवाय, मुंबई इंडियन्सचा फलंदाज ‘विल जॅक्स’नेही (Will Jacks) ताण वाढवला आहे.

खरं तर या खेळाडूंना वेस्ट इंडिजविरुद्धच्या 3 सामन्यांच्या वनडे आणि टी20 मालिकेत इंग्लंडसाठी सहभागी व्हायचे आहे. वनडे मालिका 29 मे ते 3 जून दरम्यान खेळवली जाईल, तर टी20 मालिका 6 जून ते 10 जून दरम्यान होणार आहे. या महत्त्वाच्या मालिकेसाठी या खेळाडूंना इंग्लंड क्रिकेट संघात संधी मिळाली आहे.

आयपीएल 2025चा फायनल सामना (3 जून) रोजी खेळला जाणार आहे. तसेच काही सामने डबल हेडरमध्ये खेळवले जाणार आहेत. उर्वरित आयपीएलची स्पर्धा 6 ठिकाणांवर होणार आहे.

आयपीएल 2025 स्पर्धेतील उर्वरित सामन्यांचे संपूर्ण वेळापत्रक-

17 मे- रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स (बंगळुरू)
18 मे – राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्स (जयपुर)
18 मे – दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध गुजरात टायटन्स (दिल्ली)
19 मे – लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद (लखनऊ)
20 मे – चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स (दिल्ली)
21 मे- मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (मुंबई)
22 मे – गुजरात टायटन्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स (अहमदाबाद)
23 मे – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद (बंगळुरू)
24 मे- पंजाब किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (जयपूर)
25 मे – गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स (अहमदाबाद)
25 मे- सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स (दिल्ली)
26 मे – पंजाब किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स (जयपुर)
27 मे- लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (लखनऊ)

29 मे – पहिला क्वालिफायर सामना
30 मे- एलिमिनेटर
1 जून – दुसरा क्वालिफायर सामना
3 जून – फायनल सामना

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---