आयपीएल 2025 ची लगबग आतापासूनच सुरू झाली आहे. किती खेळाडूंना रिटेन करण्यची संधी मिळेल आणि आरटीएमचा किती प्रमाणात वापर करता येईल, याबाबत चर्चा सुरू आहे. दरम्यान, अनेक संघांच्या प्रशिक्षकांबाबतही अपडेट्स समोर येत आहेत. अलीकडेच राजस्थान रॉयल्सबाबत बातमी आली होती की, राहुल द्रविड संघाचे नवे मुख्य प्रशिक्षक बनू शकतात.
आयपीएलमध्ये मुख्य प्रशिक्षकाची भूमिका खूप महत्त्वाची असते. संघाला चॅम्पियन बनवण्यात त्याचं योगदान लक्षणीय असतं. यामुळे सर्व फ्रँचायझी नेहमीच सर्वोत्तम प्रशिक्षकाच्या शोधात असतात. या बातमीत आम्ही तुम्हाला अशा 3 संघांबद्दल सांगणार आहोत, ज्यांना आयपीएल 2025 पूर्वी त्यांचे मुख्य प्रशिक्षक बदलण्याची गरज आहे.
(3) पंजाब किंग्ज – पंजाब किंग्जला मुख्य प्रशिक्षक ट्रेव्हर बेलिस यांना हटवण्याची आवश्यकता आहे. पंजाबनं सप्टेंबर 2022 मध्ये बेलिस यांची दोन वर्षांसाठी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली होती. मात्र, या दोन वर्षांत संघाची कामगिरी अजिबात चांगली झाली नाही. आता बेलिस यांचा करारही संपला आहे. त्यामुळे त्यांना हटवून संघाला दुसरा प्रशिक्षक आणता येईल.
(2) गुजरात टायटन्स – गुजरात टायटन्सला मुख्य प्रशिक्षक आशिष नेहरा यांना हटवायचं आहे. नेहरा प्रशिक्षकपदाचा राजीनामा देऊ शकतात, अशा बातम्याही आल्या आहेत. आशिष नेहराच्या गुजरात टायटन्सनं आपल्या पदार्पणाच्या हंगामातच विजेतेपद पटकावलं होतं. तर दुसऱ्या हंगामात संघ उपविजेता राहिला होता. यानंतर त्यांच्या प्रशिक्षक शैलीचं खूप कौतुक झालं होतं. मात्र, आयपीएल 2024 मधील निराशाजनक कामगिरी नंतर त्याची प्रशिक्षकपदावरून हकालपट्टी केली जाण्याची शक्यता आहे.
(1) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं गेल्या हंगामात अँडी फ्लॉवरची प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली होती. पण त्यांच्या प्रशिक्षणाखाली संघाला विजेतेपद मिळवता आलं नाही. आरसीबीनं एका भारतीयाची मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. गुजरात टायटन्स आणि केकेआरसारख्या संघांनी भारतीय प्रशिक्षकांच्या जोरावर इतिहास रचला आहे.
हेही वाचा –
“मला ऑस्ट्रेलियासाठी कसोटी क्रिकेट खेळायचे आहे” दिग्गज फिरकीपटूनं व्यक्त केली इच्छा
2025च्या आयपीएलमध्ये ‘या’ 3 संघांच्या कर्णधारपदासाठी अश्विन ठरु शकतो उत्तम पर्याय?
श्रीलंका दौऱ्यावर भारताचे हे 3 महान फलंदाज फ्लॉप, चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी संघातून होऊ शकते हकालपट्टी