कोरोना व्हायरसमुळे भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका ही द्विपक्षीय मालिका रद्द झाली आहे. 3 सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द झाल्यानंतर इतर दोन सामने आधी प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश न देता खेळवले जाणार होते. पुढे ते दोनही सामने रद्द करण्यात आले.
भारतात रद्द झालेली ही क्रिकेटमधील तिसरीच वनडे द्विपक्षीय मालिका होती.
भारत विरुद्ध इंग्लंड 2008 मालिका-
2008मध्ये इंग्लंड भारतात 7 वनडे व 2 कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यासाठी आले होते. यातील वनडे मालिकेतील पहिले 4 सामने खेळवले गेले होते. तर पाचवा सामना हा 26 नोव्हेंबर 2008 रोजी खेळवला गेला. हा सामना कटक येथे सुरु होता त्याच रात्री मुंबईवर हल्ला झाला. यामुळे ही मालिकाच रद्द करण्यात आली होती. नंतर काही दिवसांनी इंग्लंडने कसोटी मालिकेतील 2 कसोटी सामने खेळले. भारत या मालिकेत 5-0ने आघाडीवर होता.
वेस्ट इंडिज विरुद्ध भारत 2014-15 मालिका-
2014मध्ये वेस्ट इंडिजचा संघ भारत दौऱ्यावर 5 वनडे आणि 1 टी20 सामना खेळणार होता. यातील पहिले दोन वनडे सामने सुरळीत पार पडले. तिसरा सामना सायक्लाॅन अर्थात वादळामुळे रद्द करण्यात आला. नंतर चौथा सामना झाल्यावर वेगळीच गोष्ट समोर आली. वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्ड आणि खेळाडू यांच्यात मानधनावरुन सुरु असलेल्या वादामुळे ते खेळाडू मायदेशी परतले. त्यांनी पाचव्या व शेवटच्या वनडे सामन्यातही भाग घेतला नाही. भारत या वनडे मालिकेत 2-1ने आघाडीवर होता.
दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत 2020 मालिका-
दक्षिण आफ्रिका या दौऱ्यात 3 वनडे सामने खेळणार होती. परंतु पहिला सामना पावसामुळे वाया गेला तर दुसरा व तिसरा सामना करोना व्हायरसमुळे रद्द करण्यात आला.
ट्रेडिंग बातम्या-
– विश्वचषक उपविजेत्या केवळ या महिला क्रिकेटरचा झाला यथोचित सन्मान
–टीम इंडियाचा हा शिलेदार करणार टी20मध्ये दणदणीत द्विशतक
– क्रिकेटपासून दूर असलेला अश्विन चेन्नईकरांवरच भडकला
– भारत व इंग्लंडकडून कसोटी सामने खेळणारा हा एकमेव क्रिकेटपटू…






