---Advertisement---

आयपीएल २०२०: ३ खेळाडू त्यांच्या आयपीएल संघासाठी ठरु शकतात अत्यंत महागडे

On: गुरूवार, ऑगस्ट 20, 2020 8:11 PM
---Advertisement---

आयपीएलचे १३ वे सत्र १९ सप्टेंबरपासून भारताऐवजी युएईमध्ये सुरू होईल. कोरोना विषाणूमुळे हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. आयपीएल युएईमध्ये होत असल्याने सर्व संघांना घराच्या मैदानाचा फायदा होणार नाही.

पण सर्व संघ आलेली परिस्थिती सांभाळून आयपीएलची तयारी करत आहेत. तसेच सध्या सर्व संघांच्या फ्रँचायझींना त्यांनी लिलावात निवड केलेल्या सर्व खेळाडूंनी चांगली कामगिरी करावी अशी अपेक्षा आहे. या हंगामात आयपीएलच्या लिलावात ग्लेन मॅक्सवेल, पॅट कमिन्स, टॉम बंटन, पियुष चावला आणि डेव्हिड मिलरसह अनेक दिग्गज खेळाडूंची मोठी बोली लागली आहे.

परंतु, आयपीएलच्या या हंगामात असेही काही खेळाडू आहेत ज्यांची निवड कदाचित त्यांच्या संघांला भारी पडू शकेल. हे खेळाडू त्यांच्या संघाने मोठ्या प्रमाणात पैसे देऊन विकत घेतले आहेत परंतु या हंगामात त्यांना हा करारही महागात पडू शकतो. जाणून घेऊया त्या ३ खेळाडूंबद्दल, या आयपीएल हंगामात ज्यांची निवड त्यांच्या संघांसाठी खूप महागडी ठरू शकते.

३. अजिंक्य रहाणे – संघ – दिल्ली कॅपिटल (५.२५ कोटी)

दिल्ली कॅपिटलने अजिंक्य रहाणेला ५.२५ कोटींची रक्कम देऊन लिलावाआधीच प्लेअर ट्रेडिंह विंडोमधून आपल्या संघात सामील करून घेतले. मागील काही आयपीएल हंगामात रहाणे चांगल्या फॉर्ममध्ये असल्याचे दिसले नाही. आयपीएलमध्ये त्याचा स्ट्राइक रेट १२२ आहे आणि त्याला मोठे फटाके खेळण्यासाठी थोडा वेळ लागतो.

दिल्ली कॅपिटल संघात पृथ्वी शॉ आणि शिखर धवनच्या रूपाने एक सलामीची जोडी आहे. याशिवाय मध्यक्रमात पंत आणि अय्यरसारखे जबरदस्त फलंदाज आहेत. अशा परिस्थितीत अजिंक्य रहाणेची अंतिम अकरामध्ये निवड होणे अवघड आहे. पण तरीही झाली तरी त्याला चांगली कामगिरी करुन संघातील स्थान कायम करावे लागेल, नाहीतर दिल्ली संघात चांगले पर्यायी फलंदाज उपलब्ध आहेत. या कारणामुळेच रहाणे दिल्ली संघासाठी अत्यंत महागात पडू शकतो असे म्हणता येईल. रहाणेची कामगिरी कशी होईल हे बघणे महत्वाचे ठरेल.

२. ख्रिस मॉरिस – संघ – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (१० कोटी)

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची सर्वात मोठी दुर्बलता म्हणजे डेथ ओव्हर्स गोलंदाजी. आयपीएल २०१७ मध्ये, त्यांनी मिल्सवर विश्वास दाखवला परंतु, त्याने केवळ ५ बळी मिळवले. यंदाच्या लिलावात आरसीबीने दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू ख्रिस मॉरिस याला १० कोटींच्या मोबदल्यात विकत घेतले.

परंतु, मॉरिसच्या मागील २ वर्षातील टी-२० क्रिकेटच्या कामगिरीकडे पाहता, तो फारसा चमकलेला दिसून येत नाही. त्यामुळे तो सुद्धा खूप महागडा पडू शकतो. त्याचा इकॉनमी रेट ९.१९ आहे.

१. नॅथन कूल्टर नाइल – संघ – मुंबई इंडियन्स (८ कोटी)

यावेळी मुंबई इंडियन्सच्या संघाला नॅथन कूल्टर नाइलचा समावेश करण्यात आला आहे. कुल्टर नाईलला तब्बल ८ कोटींमध्ये खरेदी केले आहे. गेल्या दोन वर्षांत त्याची कामगिरी फारशी प्रभावी दिसली नाही. आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये त्याचा इकॉनमी रेट ८.६ च्या वर आहे. मुंबई संघात आधीपासूनच ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह आणि लसिथ मलिंगासारखे दिग्गज गोलंदाज आहेत. अशा परिस्थितीत त्याला अंतिम अकरामध्ये स्थान मिळण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे ८ कोटींच्या रक्कम त्याच्यासाठी मोजणे मुंबई इंडियन्सला महागडे ठरू शकेल.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---