चेन्नईमधील ३ वर्षाची मुलगी पी संजना हिने साडेतीन तासात ११११ बाण मारून गिनीजबुकमध्ये विश्वविक्रम करण्याचा प्रयत्न केला. आठ मीटर अंतरावरून तीने हे नेम साधले आहेत.
एमजीआर जानकी कॉलेजमध्ये संजनाने केलेल्या या प्रयत्नांनी तेथिल उपस्थितांची मने जिंकली. तसेच यावेळी दक्षिण आशिया तिंरदाजी असोसिएशनचे अधिकारीही या ठिकाणी उपस्थित होते. त्यांनीच याचे निकाल गिनीजकडे पोहचवले.
गिनीजच्या नियमानुसार संजनाने प्रत्येक एक तासानंतर ५ मिनिटांची विश्रांती घेतली. या विक्रमासाठी ती मागील तीन महिन्यापासून सराव करत होती.
“संजनाला सराव देणे हे माझ्यासाठीचे खूप मोठे आव्हान होते. ती माझी सर्वाधिक कमी वयाची दुसरीच विद्यार्थी आहे. आतापर्यंत मी खेळाबद्दल एवढे जास्त प्रेम कधीच नाही बघितले. तिने ज्या पद्धतीने तिरंदाजी करत आहे भविष्यात नक्कीच ती ऑलिंपिकमध्ये जाईल”, असे संजनाचे प्रशिक्षक शिहान हुसैनी म्हणाले.
“तिच्या दुसऱ्या वाढदिवसाला तीर-कमान भेटवस्तू मिळाले होते. ती दिवसभर त्याच्याशीच खेळत असे आणि बाकीच्या कोणत्याच खेळण्याला हात लावत नसे”, असे संजनाचे वडिल प्रेमनाथ म्हणाले.
संजनाच्या या कामगिरीमुळे तिच्या पालकांनी तिला पुढे अजून शिकवण्याचा ठरवले आहे. तसेच तिला भविष्यात ऑलिंपिकसाठी तयार करू असेही म्हटले आहे.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
–एशियन गेम्स: कुस्तीपटू दिव्या काकरानने जिंकले कांस्यपदक
–बजरंग पुनियाने सुवर्णपदक केले अटल बिहारी वाजपेयींना समर्पित