ऑस्ट्रेलियाचा माजी लेगस्पिनर शेन वॉर्न याने या जगाचा निरोप घेतलेल्या गोष्टीला आता वर्षभरापेक्षा जास्त काळ लोटला आहे. असे असले तरी वॉर्न याने आपल्या कारकिर्दीत असे काही कारणामे करून दाखवले आहेत, ज्यामुळे तो नेहमीच आठवणीत राहील. रविवारी (4 जून) त्याने केलेल्या एका कारनाम्याला 30 वर्षे पूर्ण होत आहेत. तो कारनामा म्हणजे त्याने टाकलेला ‘बॉल ऑफ द सेंचुरी’. 30 वर्षांपूर्वी इंग्लंडविरुद्ध ओल्ड ट्रॅफर्ड येथे ऍशेस कसोटी मालिकेच्या कसोटी सामन्यात वॉर्नने इंग्लंडच्या माइक गॅटिंगला बाद केलेल्या चेंडूला ‘बॉल ऑफ द सेंचुरी’ म्हटले गेले होते.
सन 1993 मध्ये इंग्लंड दौऱ्यावर ऍशेस मालिकेतील पहिल्या कसोटीत शेन वॉर्नने टाकलेल्या चेंडूला ‘बॉल ऑफ द सेंचुरी’ असे नाव देण्यात आलेले. मालिकेच्या पहिल्या कसोटीत इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ पहिल्या डावात 289 धावांवर सर्वबाद झाला. प्रत्युत्तरादाखल, इंग्लंडचे सलामीवीर ग्रॅहम गूच आणि माईक आथरटन यांनी पहिल्या गड्यासाठी 71 धावांची भागीदारी केली.
आथरटन बाद झाल्यानंतर माईक गॅटिंग फलंदाजीला आले. ऑस्ट्रेलियाचे कर्णधार ऍलन बॉर्डर यांनी चेंडू शेन वॉर्नकडे सोपविला. वॉर्नचे हे सामन्यातील पहिले षटक होते. गॅटिंग 4 धावांवर खेळत होते. वॉर्नने उंची दिलेला चेंडू टाकला. जो लेग स्टंपच्या बाहेर पडला. प्रत्येकाला वाटले की चेंडू लेग स्टंपच्या बाहेर जाईल. मात्र, त्यानंतर झाले ते पाहून सर्वजण थक्क झाले. चेंडू गॅटिंगच्या ऑफ स्टंपला जाऊन धडकला. त्यानंतर, या चेंडूला ‘बॉल ऑफ द सेंचुरी’ म्हटले गेले. पुढे एका कार्यक्रमात वॉर्नने हा चेंडू म्हणजे एक आकस्मिक घटना होती, असे म्हटलेले.
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वप्रथम 700 बळी मिळवणाऱ्या वॉर्नचे 4 मार्च 2022 रोजी थायलंड येथे आकस्मित निधन झाले होते. (30 years complete to shane warne’s ball of the century read here)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
WTC फायनलमध्ये जडेजा-अश्विन जोडीने खेळावे की नाही? माजी निवडकर्ता म्हणाला, ‘दोघांना दुर्लक्षित…’
‘सर्वजण सचिनबद्दल बोलतात, पण आशियात तोच सर्वोत्तम…’, सेहवागने गायले पाकिस्तानी खेळाडूचे गोडवे