लीड्स। मंगळवारी (17 जुलै) इंग्लंड विरुद्ध भारत संघात हेडिंग्ले मैदानावर तिसरा वनडे सामना सुरु आहे. या सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीने एक खास विश्वविक्रम केला आहे.
त्याने कर्णधार म्हणून वनडे क्रिकेटमध्ये 3000 धावा पूर्ण करण्याचा टप्पा पार केला आहे. त्याचबरोबर तो कर्णधार म्हणून वनडेत सर्वात जलद 3000 धावा करणारा खेळाडू ठरला आहे.
त्याने कर्णधार म्हणून 52 वनडे सामन्यात खेळताना 49 डावात 3000 धावा पूर्ण केल्या आहेत. यात त्याच्या 13 शतकांचा आणि 13 अर्धशतकांचा समावेश आहे.
या सामन्यातही त्याने 72 चेंडूत 71 धावा करत त्याच्या वनडे कारकिर्दीतील 48 वे तर कर्णधार म्हणून 13 वे अर्धशतक केले आहे.
याबरोबरच कर्णधार म्हणून वनडेमध्ये 3000 धावा करणारा विराट हा भारताचा चौथाच खेळाडू आहे. याआधी एमएस धोनी, मोहम्मद अझरुद्दीन आणि सौरव गांगुली यांनी हा कारनामा केला आहे.
विशेष म्हणजे वनडेत सर्वात जलद 1000 आणि 2000 धावा करणाऱ्या कर्णधारांच्या यादीतही विराट अव्वल क्रमांकावर आहे. त्याने 17 डावात 1000 धावा तर 36 डावात 2000 धावा पूर्ण केल्या होत्या.
जानेवारी 2017 मध्ये भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीने सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील कर्णधारपद सोडले. त्यामुळे कसोटी क्रिकेटप्रमाणे मर्यादीत षटकांच्या क्रिकेटसाठीही भारतीय संघाच्या नेतृत्वाची धूरा विराटकडे सोपवण्यात आली होती.
कर्णधार म्हणून वनडेत सर्वात जलद 3000 धावा करणारे खेळाडू:
49 डाव – विराट कोहली
60 डाव – एबी डिव्हिलियर्स
70 डाव – एमएस धोनी
74 डाव – सौरव गांगुली
83 डाव – मिस्बाह उल हक/ ग्रॅमी स्मिथ
Indi'a @imVkohli has smashed the record for the fastest to reach 3,000 ODI runs as captain! #howzstat #ENGvIND pic.twitter.com/pivnklVHXK
— ICC (@ICC) July 17, 2018
महत्त्वाच्या बातम्या:
–म्हणून जोकोविचच्या मुलाला पाहाता आली नाही विंबल्डनची फायनल!
–अजय देवगण आणि तुझे नाते काय? पोलार्डचा कृणाल पंड्याला प्रश्न