सध्या क्रिकेट खेळणारे सर्वच देश फिटनेसला महत्त्व देताना दिसत आहेत. त्यामुळे यो-यो टेस्टचा अनेक देश खेळाडूंचा फिटनेस तपासण्यासाठी वापर करत आहेत. याला इंग्लंडही अपवाद नाही.
या यो-यो टेस्टमध्ये इंग्लंडचा माजी कर्णधार अॅलिस्टर कूक हा चॅम्पियन असल्याचे त्याचा संघसहकारी जॉनी बेअरस्टोने सांगितले आहे.
इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डने सोशल मिडियावर इंग्लंड संघातील काही खेळाडूंनी यो-यो टेस्ट दिल्याचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात कूक आणि जेम्स अँडरसन हे धावत आहेत.
तसेच या व्हिडिओत दिसते की इंग्लडचे बेअरस्टो, कूक, जेम्स अँडरसन, जो रुट, स्टुअर्ट ब्रॉड अशा अनेक खेळाडूही यो-यो टेस्टसाठी हजर होते.
Another year, another yo-yo test! 😅
WATCH: https://t.co/5zj9Njh1MB pic.twitter.com/aUmOci07vL
— England Cricket (@englandcricket) July 29, 2018
https://www.instagram.com/p/Bl0HBoCF9N_/?taken-by=englandcricket
याबरोबरच इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डने वेबसाईटवरही एक व्हिडिओ शेअर केला आहे.
या व्हिड्ओत बेअरस्टो कूकबद्दल म्हणाला, ‘यो-यो टेस्ट काहीशी कठीणच आहे. मागील काही वर्षांपासून आम्हाला ही टेस्ट द्यावी लागते. हे काही मजेदार नाही पण मागील काही वर्षांपासून कूक या टेस्टमध्ये जिंकत आहे. तो मशीन आहे. मी त्याला स्प्रिंट टेस्टमध्ये लढत देईल पण जेव्हाही यो-यो टेस्टची गोष्ट येते तेव्हा त्याला थांबवणे कठीण असते.’
ही यो-यो टेस्ट भारताविरुद्ध 1 आॅगस्टपासून सुरु होणाऱ्या कसोटी मालिकेआधी झाली आहे. बीसीसीआयनेही भारतीय खेळाडूंना संघात स्थान मिळवण्यासाठी ही टेस्ट सक्तीची केली आहे.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
–मिसेस गायतोंडे आहे सेक्रेड गेम्समधील धोनीचं आवडत पात्र
–षटकार आणि गेल! पुन्हा एकदा ख्रिस गेलचा क्रिकेटमध्ये धुमाकूळ
–ब्रिटिश जनतेला लवकरच कळेल, कोहली काय चीज आहे!