---Advertisement---

पाकिस्तानमध्ये कोहलीची क्रेझ! ‘RCB-RCB’च्या घोषणांनी बाबर आझमला टेन्शन?

On: शनिवार, फेब्रुवारी 15, 2025 5:30 PM
---Advertisement---

आगामी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 ही स्पर्धा पाकिस्तानच्या यजमानपदाखाली खेळण्यात येणार आहे. केवळ भारतीय संघाचे सामने दुबईमध्ये खेळले जाणार आहेत. पाकिस्तानमधील तमाम चाहते विराट कोहलीला प्रत्यक्षात खेळताना बघण्यापासून मुकणार आहेत कारण, भारतीय संघाने स्पर्धेसाठी पाकिस्तान दौरा रद्द केला आहे. आत्ता चर्चा चालू आहे ती एका व्हिडिओची ज्यामध्ये पाकिस्तानमधील चाहते ‘विराट कोहली जिंदाबाद’ असा नारा देताना दिसत आहेत.

व्हिडिओ असा आहे की, असंख्य लोक एकाच जागी एकत्र येतात व त्यापैकी एक व्यक्ती ‘विराट कोहली जिंदाबाद’ असा नारा द्यायला सुरुवात करतो. व इतर लोक ‘RCB-RCB’ असा नारा द्यायला सुरुवात करतात. यावेळी बाबर आझमच्या चाहत्यांनी देखील तिथे हजेरी लावली होती परंतु, विराट कोहलीच्या चाहत्यांसमोर ते टिकू शकले नाहीत.

विराट कोहली भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली नुकत्याच इंग्लंडविरुद्ध झालेल्या एकदिवसीय सामन्यात खेळताना दिसला. या मालिकेत त्याने दोन सामने खेळले होते. कटकमध्ये झालेल्या मालिकेतील दुसऱ्या आणि त्याच्या पहिल्या सामन्यात विराट कोहली पराभूत झाला होता. कटक वनडेमध्ये विराट कोहलीने निव्वळ 5 धावा केल्या.त्यानंतर अहमदाबादमध्ये खेळल्या गेलेल्या पुढील सामन्यात विराट कोहलीने जोरदार अर्धशतकी खेळी केली.

बाबर आझम चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वीच पाकिस्तानचा माजी कर्णधार बाबर आझम चांगली कामगिरी करू शकला नाही. पाकिस्तानने 8 संघाच्या चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी घरच्या मैदानावर न्युझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेसोबत तिरंगी मालिका खेळली. पाकिस्तानने मालिकेत अंतिम सहित तीन सामन्यात सहभाग घेतला, ज्यामध्ये बाबर आजमने क्रमशः 10, 23 आणि 29 धावा केल्या.

महत्वाच्या बातम्या:

विराट कोहली RCB कर्णधार का नाही बनला? माजी क्रिकेटपटूचा मोठा खुलासा

विराट कोहली RCB कर्णधार का नाही बनला? माजी क्रिकेटपटूचा मोठा खुलासा

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025: 5 फिरकीपटूंचा समावेश योग्य की चूक? अश्विनची प्रतिक्रिया…

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---