तिरुअनंतपुरम। भारत विरुद्ध न्यूझीलँड तिसऱ्या आणि निर्णायक टी२० सामन्यात भारताने ८ षटकांत न्यूझीलँडसमोर 68 धावांचे लक्ष ठेवले आहे. भारताने निर्धारित ८ षटकांत 5 बाद 67 धावा केल्या. डकवर्थ लुईस नियमाप्रमाणे हा सामना ८ षटकांचा करण्यात आला आहे.
भारतीय सलामीवीरांना या सामन्यात विशेष चमक दाखवता आली नाही. शिखर धवन ६ चेंडूत ६ तर रोहित शर्मा ९ चेंडूत ६ धावा काढून बाद झाले. १५ वर २ अशी अवस्था असताना कर्णधार विराट कोहलीने ६ चेंडूत १३ धावा केल्या. परंतु त्यालाही मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आले.
आपला तिसराच सामना खेळत असलेल्या श्रेयस अय्यरला संधीचे सोने करता आले नाही. तोही ६ चेंडूत ६ धावा करून बाद झाला. मनीष पांडे ११ चेंडूत १७ धावा करून बाद झाला. त्याने १ चौकार आणि १ षटकार खेचला.
हार्दिक पंड्या (14)आणि एमएस धोनी (0) यांनी जास्त पडझड होऊ न देता संघाला ८ षटकांत 67 धावांचा टप्पा पार करून दिला.
न्यूझीलँडकडून ईश सोधी आणि टीम साऊदी यांनी प्रत्येकी २ तर ट्रेंट बोल्टने १ विकेट घेतली.
Innings Break! India 67/5 in 8 overs #INDvNZ pic.twitter.com/vfblQefhHD
— BCCI (@BCCI) November 7, 2017