पुणे : पीवायसी हिंदु जिमखाना तर्फे आयोजित तिसऱ्या पीवायसी रावेतकर फुटबॉल लीग स्पर्धेत साखळी फेरीत सलामीच्या लढतीत ग्लॅडिएटर्स व एससीआय वॉरियर्स यांच्यातील लढत ४-४ अशी बरोबरी सुटली.
पीवायसी हिंदू जिमखाना क्लब येथील मैदानावर आजपासून सुरु झालेल्या या स्पर्धेत सलामीच्या लढतीत दोन्ही संघानी तोडीस तोड खेळ केला. २ऱ्या मिनिटाला ग्लॅडिएटर्सच्या सिद्धार्थ भोळेने गोल करून संघाचे खाते उघडले. ३ऱ्या मिनिटाला वॉरियर्सच्या क्षितिज कोतवालने करून बरोबरी साधली. चौथ्या मिनिटाला सिद्धार्थ भोळेने दुसरा गोल करून संघाची आघाडी २-१ ने वाढवली. पण ही आघाडी त्यांना फार काळ टिकवता आली नाही. वॉरियर्सच्या प्रेरित गोयलने गोल करून संघाला बरोबरी साधून दिली. आठव्या मिनिटाला ग्लॅडिएटर्सच्या प्रभांश मथुराने, तर वॉरियर्सच्या अभिषेक परमार यांनी गोल केले. पूर्वार्धात हि बरोबरी कायम होती.
उत्तरार्धात, १८व्या मिनिटाला ग्लॅडिएटर्सच्या गौरव शहाने गोल करून संघाला ४-३ अशी आघाडी प्राप्त करून दिली. पण दोनच मिनिटांनी वॉरियर्सच्या शुभांकर भजेकरने गोल करून संघाला ४-४ अशी बरोबरी साधून दिली. सामन्याच्या शेवटपर्यंत हि बरोबरी कायम होती.
दुसऱ्या लढतीत बाँगव्हीला निंजाज व विंटेज वायकिंग्स यांच्यातील सामना १-१ असा बरोबरीत सुटला. निंजाजकडून तनिश दादलानी(५मि.)ने तर, वायकिंग्स कडून चित्रल क्षेत्री(१५मि.) ने एक गोल केला. याआधी स्पर्धेचे उद्घाटन पीवायसी हिंदु जिमखानाचे अध्यक्ष कुमार ताम्हाणे, मानद सचिव सारंग लागु आणि रावेतकर ग्रुपचे अमोल रावेतकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्पर्धा संचालक अभिषेक ताम्हाणे, नंदन डोंगरे, अभिषेक भागवत आदी मान्यवर उपस्थित होते.
निकाल: साखळी फेरी:
ग्लॅडिएटर्स: ४(सिद्धार्थ भोळे २, ४मि., प्रभांश मथुरा ८मि., गौरव शहा १८मि.) बरोबरी वि. एससीआय वॉरियर्स: ४(क्षितिज कोतवाल ३मि., प्रेरित गोयल ६मि., अभिषेक परमार १०मि., शुभांकर भजेकर २०मि.);
बाँगव्हीला निंजाज: १(तनिश दादलानी ५मि.)बरोबरी वि.विंटेज वायकिंग्स: १(चित्रल क्षेत्री १५मि.)