नवी दिल्ली। कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावानंतर हळू- हळू क्रिकेटचे पुनरामगन होत आहे. इंग्लंडमध्ये इंग्लंड आणि वेस्ट इंडिज संघात कसोटी क्रिकेट खेळले जात आहे, तर पाकिस्तान संघही इंग्लंडमध्ये पोहोचला असून आपल्या मालिकेची वाट पाहत आहे. यादरम्यान दक्षिण आफ्रिकामध्येही क्रिकेटची सुरुवात होत आहे. क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने मैदानात परतण्यासाठी इतिहासातील सर्वात वेगळा सामना खेळण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यात २ नाही तर ३ संघात सामना खेळला जाणार आहे.
यातील एका संघाचे नेतृत्व माजी खेळाडू एबी डिविलियर्स (AB De Villiers) करणार आहे. तर दुसर्या संघाचे नेतृत्व सध्याचा कर्णधार क्विंटन डी कॉक (Quinton De Kock) करणार आहे. कागिसो रबाडाला (Kagiso Rabada) आपल्या वैयक्तिक कारणामुळे सामन्यात भाग घेता येणार नाही, त्यामुळे तिसर्या संघाचे नेतृत्व हेनरिक क्लॅसेन (Heinrich Klaasen) करणार आहे. क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने बुधवारी (१७ जून) अधिकृतपणे या सामन्यांची घोषणा केली आहे.
The first ever #3TCricket game will be broadcast locally on SuperSport 2 from 10:45am onwards, but here are the international broadcast channels.
Check your local TV guide for times and sign-up on https://t.co/SsaJFqHTvr for exclusive content.#RainStartsPlay pic.twitter.com/fPeXhpqrMP
— 3TCricket (@3TCricket) July 17, 2020
या सामन्यात एकसोबत ३ संघ मैदानावर उतरणार असून प्रत्येक संघ फलंदाजी आणि गोलंदाजी करेल. त्यामुळे या क्रिकेट प्रकाराचे नाव ३टी क्रिकेट (3T Cricket) असे ठेवण्यात आले आहे. हा सामना ३६ षटकांचा असणार आहे. एकता कपच्या नावाखाली हा सामना एक चॅरिटी सामना म्हणून खेळला जाणार आहे. ज्याद्वारे जमा झालेले सर्व पैसे कोरोना व्हायरस बाधित व्यक्तींना मदत करण्यासाठी दान केले जाणार आहेत.
क्रिकेट प्रकार आणि नियम
क्रिकेट दक्षिण आफ्रिकेनेही या अनोख्या सामन्याचे नियम बदलले आहेत. त्यानुसार प्रत्येक संघात ८ खेळाडू असतील. आणि ३६ षटकांचा सामना खेळला जाईल. ज्यामध्ये प्रत्येक १८ षटकांत ब्रेक घेतला जाईल. त्यामध्ये प्रत्येक संघ ६-६ षटके फलंदाजी करेल आणि १८ षटकांनंतर पुन्हा ६-६ षटके फलंदाजी करतील. इतकेच नाही, तर संघाची ७ वी विकेट पडल्यास एकटा खेळाडू फलंदाजी करू शकतो. परंतु त्याला १ ऐवजी २ धावा काढाव्या लागतील. जर पहिल्या हाफमध्ये ७ पेक्षा कमी विकेट पडल्या, तर उर्वरित फलंदाज दुसऱ्या हाफमध्ये त्याच प्रकारे फलंदाजी करेल.
गोलंदाजीच्या बाबतीत प्रत्येक संघाला विरोधी संघाविरूद्ध नवीन चेंडू वापरावा लागेल. शिवाय प्रत्येक गोलंदाज जास्तीत जास्त ३ षटके गोलंदाजी करू शकेल. सामना जिंकणार्या संघाला सुवर्ण, द्वितीय क्रमांकाला रौप्य आणि तिसऱ्या क्रमांकाच्या संघाला कांस्य चषक देण्यात येईल. आणि जर सामना दोन संघात बरोबरीत सुटला, तर त्याचा निर्णय सुपर ओव्हर खेळवून केला जाईल. आणि जर तिन्ही संघात असं झालं तर तिन्ही संघांना सुवर्ण चषक दिले जाईल.
प्रत्येक संघाला आपल्या १२ व्या षटकात नवीन चेंडूचा वापर करावा लागेल, जो दोन्ही विरोधी संघाविरुद्ध वापरला जाईल.
दक्षिण आफ्रिकेत आज होणाऱ्या चॅरिटी सामन्याबद्दल सर्वकाही…
कधी होणार आहे दक्षिण आफ्रिकेतील चॅरिटी सामना?
– दक्षिण आफ्रिकेतील चॅरिटी सामना शनिवारी (१८ जुलै) होणार आहे.
कुठे होणार आहे दक्षिण आफ्रिकेतील चॅरिटी सामना?
– दक्षिण आफ्रिकेतील चॅरिटी सामना सुपरस्पोर्ट्स पार्क, सेंच्युरियन येथे होणार आहे.
किती वाजता सुरु होणार दक्षिण आफ्रिकेतील चॅरिटी सामना?
– दक्षिण आफ्रिकेतील चॅरिटी सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी २ वाजता सुरु होणार आहे.
कोणत्या चॅनेलवर पाहता येणार दक्षिण आफ्रिकेतील चॅरिटी सामना?
– दक्षिण आफ्रिकेतील चॅरिटी सामना स्टार स्पोर्ट्स चॅनेल्सवर पाहता येणार आहे.
ट्रेंडिंग घडामोडी-
-आनंदाची बातमी: २६ सप्टेंबरपासून या देशात होणार आयपीएलला सुरुवात?
–प्रतिस्पर्धी संघाने मिळून केलेल्या धावांपेक्षाही मोठी खेळी करणारे ५ क्रिकेटपटू
-बीसीसीआयला मोठा झटका: डेक्कन चार्जर्सला हटवल्याबद्दल भरावा लागणार ४८०० कोटींचा दंड