कॅरेबियन प्रिमीयर लीगमध्ये 25 आॅगस्टला बार्बाडोस ट्रिडेन्ट्स विरुद्ध सेंट किट्स आणि नेविस पॅट्रिआॅट्स यांच्यात पार पडलेल्या सामन्यात मोहम्मद इरफान या वेगवान गोलंदाजाने टी20 क्रिकेट इतिहासात चार षटकांच्या स्पेलमध्ये सर्वात कमी धावा देण्याचा विक्रम केला आहे.
त्याने या सामन्यात बार्बाडोस संघाकडून खेळताना 4 षटकांच्या स्पेलमध्ये 3 षटके निर्धाव टाकली तर या स्पेलमध्ये एकच धाव दिली आहे. त्याचबरोबर 2 विकेट्सही मिळवल्या आहेत.
या सामन्यात बार्बाडोसने प्रथम फलंदाजी करताना सेंट किट्स आणि नेविस पॅट्रिआॅट्सला विजयासाठी 148 धावांचे आव्हान दिले होते.
इरफानने सामन्याच्या दुसऱ्या डावात पहिल्याच चेंडूवर स्फोटक फलंदाज ख्रिस गेलला बाद केले. तसेच त्याच्या दुसऱ्या षटकात त्याने एविन लेविसलाही बाद करत सेंट किट्स आणि नेविस पॅट्रिआॅट्स संघाला दुसरा धक्का दिला.
त्याने त्याचे पहिले तीनही षटके निर्धाव टाकली होती मात्र अखेर त्याच्या चौथ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर ब्रेंडन किंगला एक धाव घेण्यात यश आले.
Mohammad Irfan's figures: 4-3-1-2 😯
And yet he finished on the losing side with @BIMTridents as @sknpatriots fought back for the win! #CPL18 ⬇️https://t.co/clLOcJm8S2 pic.twitter.com/IOegwdIJoG
— ICC (@ICC) August 26, 2018
मात्र तरीही बार्बाडोसच्या अन्य गोलंदाजांना खास काही करता आले नसल्याने सेंट किट्स आणि नेविस पॅट्रिआॅट्सने बार्बाडोस संघाने प्रथम फलंदाजी करताना दिलेले 148 धावांचे आव्हान 18.5 षटाकतच पूर्ण करत हा सामना 6 विकेट्सने जिंकला.
इरफान त्याच्या कामगिरीबद्दल म्हणाला, ‘मी आनंदी आहे पण मला जर माझा संघ विजयी झाला असता तर अजून जास्त आनंद झाला असता. पण टी20 क्रिकेटमधील मी चांगला गोलंदाजी स्पेल टाकला त्याचा आनंद आहे.’
तसेच तो म्हणाला गोलंदाजीला मदत करणाऱ्या खेळपट्टीवर खेळायला आवडते आणि त्याला त्याच्या उंचीमुळे ज्यादाचा बाउंसही मिळत असल्याचेही त्याने सांगितले. त्याचबरोबर ही समाधानकारक कामगिरी असल्याचेही त्याने सांगितले.
या सामन्यात सेंट किट्स आणि नेविस पॅट्रिआॅट्सकडून ब्रेंडन किंगने 49 चेंडूत 5 षटकार आणि 4 चौकारांच्या सहाय्याने 60 धावा केल्या तसेच देवॉन थॉमसबरोबर तिसऱ्या विकेटसाठी 88 धावांची भागिदारी रचत संघाला विजयाच्या समीप पोहचवले. थॉमसने 29 चेंडूत 32 धावा केल्या.
तत्पूर्वी बार्बाडोसकडून जेसन होल्डरने 35 चेंडूत 54 धावांची अर्धशतकी खेळी केली. तर पॅट्रिआॅट्सकडून एंटोन देवसीच आणि बेन कटिंग यांनी प्रत्येकी 2 तर शेल्डन कॉट्रेलने एक विकेट घेतली.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
–वाढदिवस विशेष- दिग्गज फलंदाज सर डॉन ब्रॅडमनबद्दल या १० गोष्टी माहित आहेत का?
–एशियन गेम्स: सायना नेहवालचे हे पदक का आहे भारतासाठी खास?
–पीव्ही सिंधूने एशियन गेम्सच्या अंतिम फेरीत प्रवेश करत रचला इतिहास
–“हमें तो अपनों ने लूटा, गैरों में कहा दम था…. “