साल १९७१ ला सुरु झालेले एकदिवसीय क्रिकेटचे सामने आता पूर्वीसारखे राहिले नाही. त्यात हळूहळू अमुलाग्र बदल होत गेले. सुरुवातीचा काळात २००-२५० इतकी धावसंख्या खूप मोठी आणि कठीण वाटत असे. पण आता परिस्तिथी बदलली आहे. ४०० इतकी धावसंख्या सुद्धा आजकाल सहज होते. ह्याचे कारण असे की सध्याचे फलंदाज हे आक्रमकपणे फलंदाजी करतात. पूर्वी फलंदाज आक्रमक फटके खेळण्यापेक्षा तंत्रशुद्ध फलंदाजी वर विश्वास ठेवायचे परंतु, आता सध्या तसे नाही. आता फलंदाज आक्रमक आणि ताबडतोड फलंदाजीवर विश्वास ठेवायला लागले आहेत.
एकदिवसीय सामन्यात आपण नेहमीच ५०पेक्षा अधिक धावा फलंदाजांकडून बघत असतो. कधी कधी ह्याच ५० धावा आपल्याला कमी चेंडूत बघायला मिळतात. टी२० क्रिकेटमुळे सध्याच्या क्रिकेटला जलदगतीची चालना मिळाली. आज आपण ह्या लेखात जाणून घेऊया कोण आहेत ते फलंदाज ज्यांनी १२० पेक्षा अधिकच्या स्ट्राईक रेटने ताबडतोड फलंदाजी करत सर्वाधिकवेळा ५० किंवा त्यापेक्षा अधिक धावांची खेळी केली आहे.
४. सनथ जयसूर्या(२७)
माजी श्रीलंकन फलंदाज सनथ जयसूर्या एक आक्रमक फलंदाज म्हणून ओळख होती. एकदिवसीय सामन्यात जयसूर्या जोरदार सुरुवात करून देत असे आणि विरोधी गोलादाजांवर हावी होत असे. जयसूर्याने एकदिवसीय सामन्यात ९६ वेळा ५० पेक्षा अधिक धावा केल्या आणि त्यात २७ वेळा १२० पेक्षा अधिकच्या स्ट्राईक रेटने ५० किंवा त्यापेक्षा अधिक धावांची खेळी केली आहे.
३.वीरेंद्र सेहवाग (२७)
माजी भारतीय सलामीवीर वीरेंद्र सेहवागची फलंदाजीची एक वेगळीच शैली होती. सेहवाग आक्रमक फलंदाजीसाठीच ओळखला जातो. मोठे फटके आणि मोठी खेळी करण्यात सेहवाग पटाईत होता. सेहवागने १०४.३३ च्या स्ट्राईक रेटने धावा काढल्या आहेत. जो त्याचा आक्रमक शैलीची जाणीव करून देतो. सेहवागनेसुद्धा जयसूर्या इतके २७ वेळा १२० पेक्षा अधिकच्या स्ट्राईक रेटने ५० किंवा त्यापेक्षा अधिक धावांची खेळी केली आहे.
२.शहीद आफ्रिदी (२८)
पाकिस्तानचा आफ्रिदीसुद्धा मोठे फटके आणि मोठी खेळण्यासाठी प्रसिद्ध होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मोठे फटके मारण्यात आफ्रीदेचे नाव नेहमीच चर्चेत असायाचे. आफ्रिदी पहिल्याच चेंडू पासून मोठे फटके मारण्याचा प्रयत्न करत असे. त्याने कधीही गोलंदाजाला त्याची पकड मजबूत करू दिली नाही. आफ्रिदीने ३७ चेंडूत १०० धावा करण्याचा विक्रम केला आहे. आफ्रिदीने एकूण २८ वेळा ५० किंवा त्यापेक्षा अधिक धावांची खेळी १२० पेक्षा अधिकच्या स्ट्राईक रेट केली आहे.
१. एबी डीविलीयर्स
‘मिस्टर ३६० फेम’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एबी डीविलीयर्सची ओळख अख्ख्या क्रिकेट विश्वातील लहान मुलापासून ते अगदी मोठ्यांपर्यंत आहे. क्रिकेटमधले पारंपारिक फटक्यांपासून ते ‘मोर्डेन डे क्रिकेट’ फटकेबाजी, असे विविध फटके मारणारा खेळाडू म्हणजे डीविलीयर्स. एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक जलद गतीने शतक मारण्याचा विश्वविक्रम ह्याचाच नावावर आहे. एबी डीविलीयर्सने ७८ अर्धशतक केली आहे. त्यात त्याने २९ वेळा ५० किंवा त्यापेक्षा अधिक धावांची खेळी १२० पेक्षा अधिकच्या स्ट्राईक रेट केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
कमनशिबी आरसीबी! ‘या’ पाच खेळाडूंना रिलीज करताच पुढच्या वर्षी त्यांनी जिंकली आयपीएल ट्रॉफी
आयसीसीची नवी क्रमवारी जाहीर; विराट-रोहित ‘या’ स्थानावर, तर सांघिक क्रमवारीत भारत…
एकेकाळी आंतरराष्ट्रीय क्रिकेटवर जुळ्या बंधूंनी गाजवले होते अधिराज्य; साजरा करत आहेत ५६ वा वाढदिवस