कसोटी क्रिकेटला गोलंदाजांचा खेळ म्हटले जाते, कारण सामना जिंकण्यासाठी तुम्हाला विरोधी संघाचे २० बळी घेणे आवश्यक आहे. गोलंदाजांना इथे खूप महत्त्व आहे, ते फक्त विकेट घेतात असे नाही तर शेवटी, त्यांनी केलेल्या काही धावा नेहमीच संघासाठी उपयुक्त ठरतात. आपण अनेकदा पाहिले आहे की, तळाच्या फलंदाजांनी अनेक प्रसंगी संघाला अडचणीच्या परिस्थितीतून बाहेर काढले आहे.
अलीकडेच भारत आणि इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेत भारताच्या तळाच्या फळीतील फलंदाजांनी संघासाठी महत्त्वपूर्ण धावा केल्या होत्या. डॅनियल व्हिटोरी, जयंत यादव, शॉन पोलॉक, स्टुअर्ट ब्रॉड आणि अनिल कुंबळे यांसारख्या अनेक खेळाडूंच्या नावावर शतकही जमा आहेत.
आज आपण भारतीय संघाच्या अशा चार फलंदाजांबद्दल चर्चा करणार आहोत, ज्यांनी आठव्या क्रमांकावर किंवा त्याखाली फलंदाजी करताना, कसोटी सामन्याच्या दोन्ही डावात ५० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत
१ हरभजन सिंग
सन २०१० मध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या या कसोटी मालिकेच्या पहिल्या सामन्यात भारताने पहिल्या डावात ४८७ धावांची मोठी धावसंख्या उभारली, ज्यात हरभजन सिंगने शानदार ६९ धावा केल्या.
जेव्हा भारतीय संघ दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी उतरला तेव्हा त्यांची धावसंख्या एका वेळी सहा बाद ६५ अशी झाली होती आणि सामना भारताच्या हातातून जात असल्याचे दिसत होते. तेव्हा फलंदाजीसाठी आलेल्या हरभजन सिंगने आपल्या कसोटी कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले, त्याने ११५ धावांची दमदार खेळी खेळली, त्यात त्याने ११ चौकार आणि तीन षटकारही ठोकले आणि त्याच्या खेळीमूळे सामना अनिर्णित राहिला.
२ भुवनेश्वर कुमार
सन २०१४ मध्ये इंग्लंडचा हा दौरा विराट कोहलीच्या खराब फॉर्ममुळे लक्षात राहिला असला, तरी या मालिकेच्या पहिल्या सामन्यात भुवनेश्वर कुमारने एक जबरदस्त खेळी खेळली, ज्यासाठी तो कायम लक्षात राहील. पहिल्या डावात भुवनेश्वर कुमारने मोहम्मद शमीसोबत शेवटच्या विकेटसाठी १११ धावांची विक्रमी भागीदारी केली होती. ज्यामध्ये त्याने ५८ धावांचे योगदान दिले होते.
भुवनेश्वर कुमारने दुसऱ्या डावात पुन्हा स्टुअर्ट बिन्नीसोबत आठव्या विकेटसाठी ९१ धावांची भागीदारी केली आणि यावेळी त्याने नाबाद ६३ धावा केल्या होत्या.
३ वृद्धिमान साहा
सन २०१६ मध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत दुसऱ्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणेच्या अर्धशतकांमुळे संघ सन्मानजनक धावसंख्येकडे वाटचाल करत होता. आठव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या वृद्धीमान साहाने नाबाद ५४ धावांची खेळी करत संघाचा डाव ३१६ धावांवर नेला.
पुन्हा, दुसऱ्या डावात जेव्हा भारत १०६ धावांवर सहा गडी गमावून बसला होता, साहाने पुन्हा संघाच्या आशा पल्लवित केल्या आणि नाबाद अर्धशतक झळकावले. त्याने नाबाद ५८ धावा करून भारताला विजय मिळवून दिला आणि सामना जिंकण्यात सर्वात महत्वाचे योगदान दिले.
४ शार्दुल ठाकूर
शार्दुल ठाकूरने अलीकडेच भारत आणि इंग्लंड मालिकेतील चौथ्या कसोटी सामन्यात कोणालाही अनपेक्षित अशी फलंदाजी केली. शार्दुल ठाकूर पहिल्या डावात फलंदाजीसाठी आला तेव्हा भारताची धावसंख्या ११७ धावांवर ६ अशी होती आणि संघ अडचणीत दिसत होता, पण शार्दुल ठाकूरने ३६ चेंडूंत चार चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने ५७ धावा केल्या. संघाची धावसंख्या १९१ धावांवर नेली.
दुसऱ्या डावातही शार्दुलने आपली लय कायम राखली आणि पुन्हा ६० धावांची दमदार अर्धशतकीय खेळी साकारली. शार्दुलच्या शानदार फलंदाजीमुळे भारताने इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य ठेवले आणि त्याच्या दबावाखाली इंग्लंडचा डाव बिघडला आणि भारताने सामना सहज जिंकला.
महत्त्वाच्या बातम्या –
“भारतीय संघात सुधारणेला वाव ही इतर संघांसाठी धोक्याची घंटा”
ऑलिंपिक पदक विजेती पीव्ही सिंधूनं ‘दीपवीर’सोबत घालवला क्वॉलिटी टाईम; अभिनेत्याने फोटो केला शेअर