भारतीय संघाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वेगळी ओळख निर्माण केली आहे. आयसीसीच्या सर्व स्पर्धांमध्ये भारतीय संघाने विजेतेपद पटकावले आहे. तसेच संघाचे खेळाडू देखील आयसीसीच्या क्रमवारित सर्वोच्च स्थानी असतात. फलंदाजी असो अथवा गोलंदाजी दोन्हीही गोष्टींमध्ये भारतीय संघाचे खेळाडू अफलातून कामगिरी करताना दिसतात. अशातच काही असे खेळाडू देखील आहेत, ज्यांनी आपल्या कारकीर्दीत संघासाठी उत्कृष्ट कामगिरी करत, संघाच्या सर्वात जास्त विजायांमध्ये आपला सहभाग नोंदवला आहे.
१) सचिन तेंडुलकर – ३०७ विजय
भारतीय संघासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०० शतक झळकावणारा दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकर हा या यादीत सर्वोच्च स्थानी आहे. सचिनने भारतीय संघासाठी सर्वाधिक २०० कसोटी सामने खेळले आहेत. यात त्याने एकूण १५९२१ धावा केल्या आहेत. यात त्याने ५१ शतक आणि ६८ अर्धशतक झळकावले आहे. तसेच ४६३ एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये त्याने १८४२६ धावा केल्या आहेत. यात ९६ अर्धशतक आणि ४९ शतकांचा समावेश आहे. तसेच त्याने एकमात्र टी -२० आंतरराष्ट्रीय सामना खेळला आहे. यादरम्यान तो भारतीय संघाच्या ३०७ विजायांमध्ये सहभागी झाला होता.
२) एमएस धोनी – २९५ विजय
भारतीय संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार मानल्या जाणाऱ्या एमएस धोनीने भारतीय संघाला आयसीसीच्या प्रत्येक स्पर्धेत भारतीय संघाला विजेतेपद मिळवून दिले आहे. धोनीने एकूण ९० कसोटी सामने, ३५० एकदिवसीय सामने तसेच ९८ टी-२० सामने खेळले आहेत. या ५३८ आंतरराष्ट्रीय सामन्यात त्याने १७००० पेक्षा अधिक धावा केल्या. तसेच धोनी संघात खेळत असताना भारतीय संघाने २९५ विजय नोंदवले होते.
३) विराट कोहली- २४९ विजय
भारतीय संघासाठी ८९ कसोटी सामने २५१ एकदिवसीय आणि ८४ टी-२० सामने खेळणाऱ्या विराट कोहलीने आतापर्यंत एकूण २२००० पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. तसेच ७० शतक झळकवणाऱ्या कोहलीने भारतीय संघाच्या २४९ विजयांमध्ये आपले योगदान दिले आहे.
४) युवराज सिंग – २२७ विजय
टी-२० विश्वचषक २००७ मध्ये ब्रॉडच्या एका षटकात ६ षटकार मारणाऱ्या युवराज सिंगने भारतीय संघासाठी ४० कसोटी सामने खेळले आहेत. ३०४ एक दिवसीय आणि ५८ टी-२० सामने खेळले आहेत. यात त्याने एकूण १२००० धावा केल्या आहेत. युवराजच्या १७ वर्षाच्या कारकिर्दीत त्याने भारतीय संघाने विजय मिळवलेल्या २२७ सामन्यात आपले योगदान दिले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-