सध्या भारतीय क्रिकेट संघ न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध 5 टी20, 3 वनडे आणि 2 कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. भारताच्या या दौऱ्याची सुरुवात उद्यापासून(24 जानेवारी) टी20 मालिकेने होणार आहे.
या टी20 मालिकेसाठी बीसीसीआयने निवडलेल्या 15 जणांच्या भारतीय संघात तब्बल 4 मुंबईकर खेळाडूंचा समावेश आहे. यामध्ये उपकर्णधार रोहित शर्मा, मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यर, अष्टपैलू क्रिकेटपटू शिवम दुबे आणि वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूर यांचा समावेश आहे.
या चौघांनाही उद्या ऑकलंड येथे होणाऱ्या न्यूझीलंड विरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यासाठी 11 जणांच्या भारतीय संघातही संधी मिळू शकते. कारण मागील अनेक सामन्यांपासून ते भारताच्या टी20 संघातील नियमित खेळाडू आहेत.
तसेच हे चारही खेळाडू देशांतर्गत क्रिकेट मुंबईकडून खेळतात. त्यामुळे मुंबई क्रिकेट असोसिएशनसाठीही ही अभिमानाची गोष्ट आहे की त्यांचे तब्बल 4 क्रिकेटपटू भारताच्या राष्ट्रीय संघात आहे.
न्यूझीलंड दौऱ्यासाठी असा आहे भारतीय टी20 संघ –
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), संजू सॅमसन, केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, रिषभ पंत (यष्टीरक्षक), शिवम दुबे, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी , रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर
बीसीसीआयने करारही केला नाही, आता विराट धोनीचं यात विक्रमातून नाव हटवणार
वाचा👉https://t.co/CVYWczpYoj👈#म #मराठी #Cricket #TeamIndia #NZvIND @imVkohli— Maha Sports (@Maha_Sports) January 23, 2020
बरोबर ३ वर्षांपुर्वी वनडे पदार्पण केलेल्या बुमराहबद्दल जगाला या ३ गोष्टी माहित नाहीत
वाचा👉https://t.co/is14Rya8cK👈#म #मराठी #Cricket #TeamIndia @Jaspritbumrah93— Maha Sports (@Maha_Sports) January 23, 2020