‘महिला प्रीमियर लीग’चा (Women Premier League) पुढील वर्षी तिसरा हंगाम होणार आहे. या हंगामातील पहिला मिनी लिलाव पूर्ण झाला आहे. रविवारी (15 डिसेंबर) रोजी बंगळुरू येथे झालेल्या या लिलावात भारत आणि विदेशातील 120 खेळाडू होते. त्यापैकी फक्त 19 खेळाडूंवर उर्वरित 19 स्लॉटसाठी बोली लावण्यात आली होती. या मिनी लिलावात हेदर नाईटसारखे काही दिग्गज खेळाडू विकले गेले नाहीत, तर काही युवा खेळाडूंवर पैशांचा पाऊस पडला. त्यापैकी काही खेळाडू असे होते ज्यांची किंमत 1 कोटींच्या जवळपास पोहोचली होती. चला तर मग या बातमीद्वारे त्या 4 खेळाडूंबद्दल जाणून घेऊया.
1) सिमरन शेख- महिला प्रीमियर लीगच्या या मिनी लिलावात फिरकी गोलंदाज सिमरन शेखन (Simran Shaikh) ही सर्वात महागडी खेळाडू ठरली. गुजरात जायंट्सने या युवा खेळाडूवर मोठी बोली लावली. तिला गुजरातने 1.9 कोटी रूपयांना खरेदी केले.
2) डायंड्रा डॉटिन- वेस्ट इंडिज क्रिकेट संघाची माजी कर्णधार, अनुभवी अष्टपैलू डिआंड्रा डॉटिन ही या मिनी लिलावात विकली जाणारी पहिली खेळाडू होती. या दिग्गज खेळाडूला विकत घेण्यासाठी गुजरात जायंट्सने 1.7 कोटी रूपये खर्च करत तिला आपल्या संघात समाविष्ट केले.
3) जी कमलिनी- तामिळनाडूची 16 वर्षीय यष्टीरक्षक फलंदाज जी कमलिनीने या मिनी लिलावात आश्चर्यकारक कामगिरी केली. लिलावात या युवा खेळाडूचे नाव येताच 2 फ्रँचायझी फुटल्या. दिल्ली कॅपिटल्स, मुंबई इंडियन्स यांच्यातील लढतीत मुंबई इंडियन्सने या युवा प्रतिभावान खेळाडूला 1.6 कोटी रूपयांमध्ये आपल्या संघात सामील केले.
4) प्रेमा रावत- महिला प्रीमियर लीगच्या या मिनी लिलावात उत्तराखंडची युवा फिरकी गोलंदाज प्रेमा रावतने आश्चर्यकारक कामगिरी केली. लिलावादरम्यान आरसीबीने या खेळाडूला 1.2 कोटी रुपयांची मोठी रक्कम देऊन आपल्या संघात सामील केले.
महत्त्वाच्या बातम्या-
SMAT Final 2024; फायनलमध्ये मध्य प्रदेशला चारली धूळ, मुंबईने पटकावले विजेतेपद
शानदार शतक झळकावल्यानंतर स्टीव्ह स्मिथ म्हणाला, “माझ्यासाठी गेली 3 वर्षे सर्वात कठीण…”
28 चेंडूत 12 चौकारांसह अर्धशतक, आरसीबीच्या फलंदाजाची फायनलमध्ये धमाल!