भारतीय कसोटी संघ सध्या आईसीसीद्वारा आयोजित जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याची आणि इंग्लंड विरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेची तयारी करत आहे. या सामन्यांसाठी इंग्लंड दौऱ्यावर जाण्यापूर्वी सध्या भारताचे २४ खेळाडू मुंबईत क्वारंटाईन कालावधी पूर्ण करत आहेत.
या इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय कसोटी संघात एकूण २० जणांची मुख्यत: निवड झाली आहे. तर ४ खेळाडू राखीव आहेत. विशेष म्हणजे या भारतीय संघातील काही खेळाडू असे आहेत, ज्यांनी माजी कर्णधार एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघात पदार्पण केले. मात्र, त्यांना सर्वाधिक संधी विराटच्या नेतृत्वाखाली खेळताना मिळाली. आपण अशाच ५ खेळाडूंबद्दल जाणून घेऊ ज्यांनी धोनीच्या नेतृत्वाखाली कसोटी पदार्पण केले, पण त्यांना सर्वाधिक सामने खेळण्याची संधी विराट कर्णधार असताना मिळाली.
४.अजिंक्य रहाणे
ह्या ५ खेळाडूंमध्ये पहिले नाव येते, ते म्हणजे भारतीय कसोटी उपकर्णधार अजिंक्य रहाणेचे, ज्याने कोहलीच्या अनुपस्थितीत ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिकेमध्ये भारताचे नेतृत्व करताना २-१ चा फरकाने संघाला विजय मिळवून दिला. एक खास गोष्ट म्हणजे भारतीय संघाला पहिल्या सामन्यामध्ये विराटच्या नेतृत्वाखाली हार पत्करावी लागली होती. त्यानंतर विराट पालकत्व रजा घेऊन मायदेशी परतल्यानंतर भारतीय संघाने रहाणेच्या नेतृत्वाखाली मालिकेत जबरदस्त पुरागमन केले. ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियामध्ये हरवणारा रहाणे दुसरा भारतीय कर्णधार झाला. रहाणेने कसोटी सामन्यात ७६ सामने खेळले त्यातील २० सामने हे धोनीच्या नेतृत्वात तर ५६ सामने हे कोहलीच्या नेतृत्वात खेळले आहेत.
३.चेतेश्वर पुजारा
भारतीय संघाची नवी भिंत म्हणून ओळखला जाणारा खेळाडू म्हणजे पुजारा. गेली कित्येक वर्ष त्याने भारतीय संघाच्या विजयामध्ये मोलाची कामगिरी उचलली आहे. इतकेच नाही तर गेल्या ५ वर्षात भारतीय संघाला अव्वल क्रमांकावर टिकून ठेवण्यातसुद्धा त्याचा महत्वाचा वाटा आहे. पुजाराने आपल्या एकूण कसोटी सामन्यात ८५ सामने खेळले त्यात ३१ धोनीच्या नेतृत्वात तर ५४ सामने हे कोहलीच्या नेतृत्वात खेळले आहेत.
२.आर अश्विन
ह्या यादीत तिसरे नाव म्हणजे भारतीय ऑफस्पिनर आर अश्विन. ज्याने आपल्या गोलंदाजीच्या कौशल्यावर जगभरातील फलंदाजांना नाचवले आहे, सध्याच्या कासोटी क्रिकेटमध्ये सर्वात उत्कृष्ट ऑफ स्पिनरमध्ये त्याचे नाव घेतले जाते. अश्विनने धोनीच्या नेतृत्वाखाली आपले पदार्पण केले होते. त्याने आजपर्यंत ७८ कसोटी सामने खेळला आहे. त्यात धोनीच्या नेतृत्वात २७ सामने तर कोहलीच्या नेतृत्वात ५१ सामने खेळले आहेत.
१.मोहम्मद शमी
भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी ज्याने धोनीचा नेतृत्वात २०१३ साली आपले पदार्पण केले. त्याने आत्तापर्यंत ५० कसोटी सामने खेळले त्यामधून फक्त १० सामने तो धोनी कर्णधार असताना खेळला आणि ४० सामने कोहलीच्या कर्णधारपदाखाली खेळले. विशेष म्हणजे कोहलीच्या नेतृत्वाखाली शमी भारतीय संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज म्हणून नावारुपास आला.
महत्त्वाच्या बातम्या –
लग्नाची अनोखी गोष्ट! मैदानातून थेट गाठला लग्नमंडप; संघाला विजयी करूनच पठ्ठ्या चढला बोहल्यावर
मुंबई-चेन्नई नव्हे तर ‘या’ शहराला मिळणार टी२० विश्वचषकाचे यजमानपद? बैठकीत झाली चर्चा
बापमाणूस गमावला; आता भूवीच्या आईचीही तब्येत नाजूक, रुग्णालयात आहेत भरती