क्रिकेटची ओळख असलेले सर डॉन ब्रॅडमन (Don Bradman) यांची तुलना कोणासोबत केली जाऊ शकत नाही. परंतु, असे काही खेळाडू होते ज्यांना लोक ब्रॅडमन यांच्या पेक्षा उत्तम फलंदाज मानत.
ब्रॅडमन यांचा महानतेवर कधी शंका उपस्थित केली जाऊ शकत नाही. परंतु अश्या खेळाडूंविषयी जाणून घेण्यास हरकत नाही.
४. जॉर्ज हेडली (George Hedley)
वेस्टइंडीजच्या जॉर्ज हेडली यांना “ब्लॅक ब्रॅडमन” असे म्हणत. याउलट, वेस्टइंडीजचे खेळाडू आणि लोक ब्रॅडमन यांना “व्हाईट हेडली” म्हणत. हेडली यांचा जन्म पनामामध्ये झाला ते स्पॅनिश भाषिक परिवारातून येत. त्यांना डेंटिस्ट बनविण्यासाठी इंग्लिश भाषा शिकावी म्हणून जमैकाला पाठवण्यात आले आणि त्यांनी तेथेच क्रिकेट खेळायला सुरुवात केली.
१९ वर्षी त्यांना टेनीसन एकादश संघाविरुद्ध जमैका संघाकडून खेळण्याची संधी मिळाली. त्यावेळचे, प्रसिद्ध वेगवान गोलंदाज निबी क्लार्क यांच्या गोलंदाजीसमोर हेडली यांनी अनुक्रमे १६,७१,२११,४० व ७१ धावावा काढल्या. हेडली तो सामना खेळले नसते तर त्यांच्याविषयी कोणाला माहीतच पडले नसते. १९२८ मध्ये इंग्लंडला जाणाऱ्या संघात वर्णद्वेषामुळे त्यांची निवड होऊ शकली नाही. १९२९ च्या दौऱ्यावर मात्र त्यांची निवड झाली. त्या दौऱ्यात हेडली यांनी आठ डावात ७०३ धावा केल्या. चौथ्या कसोटीच्या, चौथ्या डावात, त्यांनी केलेल्या २२३ धावा अजूनही चौथ्या डावातील विक्रम आहे.
१९३०-३१ च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात त्यांनी १००० पेक्षा जास्त धावा काढल्या. त्यांहून अधिक धावा फक्त डॉन ब्रॅडमन काढू शकले होते. १९३२ मध्ये इंग्लंडच्या प्रथमश्रेणी संघाविरुद्ध ३४४ त्यांनी धावा केल्या. इंग्लंडच्या संघाविरुद्ध फक्त दोन वेळा बाद होत ७२३ धावा बनवल्या. त्यावेळी त्यांची नीचांकी धावसंख्या ८४ होती आणि सरासरी ३६१.५ने हेडली यांच्याकडे प्रत्येक फटका होता. त्यांना बाद करणे असंभव होत. डॉन ब्रॅडमनसुद्धा त्यांचे कौतुक करत. ते म्हणत, ” हेडली लेग साईडचे ताकदवर खेळाडू आहेत आणि मी त्यांचा खूप सन्मान करतो.”
हेडली यांना ॲटलास ह्या टोपण नावाने संबोधले जात. १९३९ पर्यंत वेस्टइंडीजने झळकावलेल्या २२ शतकांपैकी १० शतके हेडली यांची होती. संपूर्ण संघाचा भार ते वाहत. १९३५ च्या इंग्लंडविरुद्धच्या शेवटच्या कसोटीत त्यांनी २७० धावा केल्या. तो वेस्टइंडीजचा इंग्लंडमध्ये पहिला मालिका विजय होता.
१९३९ मध्ये वर्णभेदामुळे ते वेस्ट इंडिजचे कर्णधार नाही बनू शकले. दुसऱ्या महायुद्धा वेळी सर्व जग ठप्प झाल्याने ते आपली प्रतिभा दाखवू शकले नाहीत. १९४८ मध्ये त्यांना वेस्टइंडीजचे कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले.
हेडली यांनी २२ कसोटीत ६०.८३ ची सरासरी राखत दहा शतके ठोकली. जास्त संधी मिळाल्या असत्या तर तर ते ब्रॅडमन यांच्या सारखी प्रसिद्धी मिळवू शकले असते. आकडे जरी स्पष्ट करत नसले तरी, जॉर्ज हेडली यांचा खेळ पाहणारे लोक त्यांना ब्रॅडमन यांच्या पेक्षा सरस फलंदाज मानत.
३. सर जॅक हॉब्स ( Jack Hobbs)
क्रिकेटचे पितामह म्हणून ओळखले जाणारे सर जॅक हॉब्स सर्वोत्कृष्ट सलामीवीर होते. सर हॉब्स यांनी ८३४ प्रथमश्रेणी सामने खेळत ५०.७० च्या सरासरीने ६१,७६० धावा काढल्या आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये ५६.९४ च्या सरासरीने ५,४१० धावा आपल्या नावे केल्या. त्यांच्या सर्व खेळ्या या, फलंदाजीसाठी अवघड अशा खेळपट्ट्यांवर आल्याने त्यांना ब्रॅडमन यांच्यापेक्षा उत्कृष्ट फलंदाज मानले जात.
सर जॅक हॉब्स यांनी वयाच्या १९ वर्षी पहिल्यांदा क्रिकेट खेळले. १९०५ मध्ये मध्ये त्यांचा सरे काउंटी संघात समावेश करण्यात आला. त्यांनी आपला खरा खेळ चाळीशीनंतर दाखवायला सुरुवात केली. आपल्या १९७ शतकांपैकी ९८ शतके ही चाळीसीनंतर आलेली होती. वयाच्या ४६ यावर्षी त्यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध शतक मारले.
२. आर्ची जॅक्सन (Archie Jackson)
आर्ची जॅक्सन अवघे २३ वर्ष जगले. अनेक लोकांचे म्हणणे होते की, आर्ची अजून जगले असते तर जगातील सर्वोत्कृष्ट फलंदाज असते. जन्माने स्कॉटिश असलेले आर्ची १९२९ मध्ये १९ वर्षी पहिल्यांदा ऑस्ट्रेलियासाठी खेळले. या सामन्यात १६४ धावांची खेळी करत पदार्पणात सर्वाधिक धावा बनविणारे खेळाडू होते. त्यांच्या ताकदवान फटक्यांचे गोलंदाजांकडे उत्तर नव्हते.
१९३० च्या प्रसिद्ध बॉडी लाईन सिरीजच्या पाचव्या कसोटीत खेळताना त्यांनी ७३ धावा बनविल्या होत्या. पुढे, तब्येत खालावत गेल्याने त्यांनी जगाचा निरोप घेतला आणि ब्रॅडमन यांच्या सोबतच्या तुलनेला पूर्णविराम लागला.
१. महादेवन सथासिवम ( Mahadevan Sathasivam)
श्रीलंका संघाला कसोटी क्रिकेटचा दर्जा मिळण्याआधी सथासिवम हे आपले क्रिकेट खेळले होते आणि त्यामुळे ते आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याच्या बाबतीत दुर्दैवी ठरले. ते प्रथमश्रेणी क्रिकेटसुद्धा खूप कमी खेळले. त्यांच्या गुणवत्तेबद्दल तेच खेळाडू सांगतात ते त्यांच्या समवेत खेळले.
१९४७ मध्ये दक्षिण भारत संघाविरुद्ध खेळताना त्यांनी चेन्नईच्या चेपॉक मैदानावर २१५ धावांची अफलातून खेळी केली होती. १९५० मध्ये कॉमनवेल्थ एकादश संघाविरुद्ध खेळताना आपल्या संघाच्या १५३ पैकी ९६ धावा एकट्याने बनवल्या होता. फ्रॅन्क वॉरेल यांनीदेखील त्यांचे कौतुक केले होते. भारताविरुद्ध देखील त्यांनी १११ धावांची सुंदर खेळी करत सर्वांची मने जिंकली. विजय मर्चंट यांनी त्यांचे कौतुक करत त्यांना स्टम्प भेट दिला होता.
फ्रॅन्क वॉरेल म्हणत, ” मी सथाशिवम यांना वर्ल्ड इलेव्हनमध्ये स्थान दिले असते.” वैयक्तिक कारणांनी सताशिवम यांना क्रिकेट सोडावे लागले. पुढे, मलेशिया व सिंगापूर या देशांचे कर्णधारपद त्यांनी भूषवले.
वाचनीय लेख –
जगातील सर्वात दुर्दैवी १० क्रिकेटपटू, ज्यांना मैदानावरच गमवावा लागला प्राण
प्रतिस्पर्धी संघाने मिळून केलेल्या धावांपेक्षाही मोठी खेळी करणारे ५ क्रिकेटपटू
सेहवागचा ३१९ धावांचा विक्रम मोडू शकणारे ५ भारतीय