भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा 8 विकेट्सने पराभव केला .भारताच्या पराभवानंतर क्रिकेटरसिकांचे लक्ष 26 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्याकडे वळले आहे. या सामन्यापूर्वी भारताला दोन मोठे झटके बसले असून नियमित कर्णधार विराट कोहली पालकत्व रजा घेवून भारतात परतणार आहे, तर भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी हाताला झालेल्या दुखापतीमुळे संपूर्ण मालिकेतून बाहेर झाला आहे. त्यामुळे दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघ कशा प्रकारे मैदानात पुनरागमन करतो, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. आपण या लेखात बघणार आहोत अशी चार कारणं त्यामुळे भारतीय संघ दुसरा कसोटी सामना जिंकू शकतो .
१) भारतीय संघासाठी उत्तम आहे मेलबर्नची खेळपट्टी –
मेलबर्नची खेळपट्टी सामान्यता फलंदाजांना अनुकूल असते. फलंदाजांना अनुकूल असलेल्या या खेळपट्टीवर भारतीय फलंदाजांना धावा बनवणे तितकेसे अवघड जाणार नाही. मागील पाच वर्षात येथे झालेल्या जवळ-जवळ प्रत्येक सामन्यात फलंदाजी करणाऱ्या संघाने 500 धावा केलेल्या आहेत. ऑस्ट्रेलियन गोलंदाज देखील या खेळपट्टी बद्दल असमाधानी दिसत आहेत. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिंसने सामन्यापूर्वी म्हटले आहे की, यावेळी मेलबर्न येथील खेळपट्टी गोलंदाजांसाठी अनुकूल असेल, अशी मी आशा करतो.
2) मागील दौर्यात या मैदानावर पूजाराने ठेवले होते शतक –
भारताच्या 2018 – 19 दौऱ्यामधील तिसरा कसोटी सामना मेलबर्न क्रिकेट ग्राउंड येथे झाला होता. या सामन्यात भारताने चेतेश्वर पुजाराच्या दमदार खेळीच्या जोरावर विजय मिळवला होता. पुजाराने पहिल्या डावात 106 धावांची उत्तम खेळी केली होती. पुजाराच्या या खेळीमुळे भारताने 137 धावांनी सामना जिंकला होता. यावेळी देखील कर्णधार अजिंक्य रहाणेला पुजाराकडून अशाच कामगिरीची अपेक्षा असेल.
3) मयंकने खेळली होती शानदार खेळी –
मयंक अग्रवाल ने मेलबर्न येथे 2018 साली झालेल्या सामन्यात आपले कसोटी पदार्पण केले होते. आपल्या पहिल्याच डावात त्याने 76 धावांची उत्तम खेळी केली होती. दुसऱ्या डावात देखील मयंकने आपले सातत्य टिकवून 42 धावा बनवल्या होत्या. निश्चितच आगामी कसोटी सामन्यापूर्वी मयंकचा आत्मविश्वास द्विगुणित झाला असेल.
4) टॉस जिंकणे महत्त्वाचे –
मेलबर्न क्रिकेट ग्राउंड वर भारताने आतापर्यंत तीन विजय मिळवले आहेत. यापैकी तीनही वेळी भारताने प्रथम फलंदाजी केली आहे. मेलबर्न क्रिकेट ग्राउंडचा इतिहास बघितला असता, प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाची विजयाची शक्यता जास्त असेल. अशा परिस्थितीत भारतीय कर्णधार अजिंक्य रहाणेने टॉस जिंकल्यास प्रथम फलंदाजी करावी. जेणे करुन भारताच्या विजयाच्या आशा आणखी वाढू शकतात.
महत्त्वाच्या बातम्या –
‘भारतीय संघ दबावात असेल, तर मी खूप खुष आहे’
‘ऍडलेडचा पराभव न विसरता मेलबर्न सामन्यात भारताने करावी नव्याने सुरुवात’, माजी दिग्गजाचा सल्ला
अरे बापरे! दहा वर्षात ‘या’ गोलंदाजाने टाकले तब्बल २७,३०८ आंतरराष्ट्रीय चेंडू
ट्रेंडिंग लेख –
…आणि सचिनचा कसोटी क्रिकेटमधील सर्वाधिक धावांचा विक्रम मोडण्याची संधी कूकने दवडली !!!
वाढदिवस विशेष: ऍलिस्टर कूकच्या नावावर आहेत हे खास ५ विक्रम
व्हिडिओ : त्या दिवशी विराटने शतक केलं अन् गंभीरने दिली सर्वात भारी भेट