कॅरिबियन प्रीमियर लीग (सीपीएल) चा २०२० हंगाम आता अंतिम टप्प्यात आला आहे. सीपीएलच्या या मोसमात आता फक्त ३ सामने उरले आहेत, ज्यात दोन सामने उपांत्य फेरीचे असून एक अंतिम सामना आहे.
सीपीएल २०२० उपांत्य फेरीत खेळणार्या चार संघांची घोषणा झाली आहे. लीग टप्प्यातील पहिल्या चार संघांनी थेट सीपीएलच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.
वेस्ट इंडिजचा दिग्गज कायरन पोलार्ड (Kieron Pollard) याच्या नेतृत्वात त्रिनबॅगो नाइट रायडर्सने प्रथम सीपीएल २०२० च्या उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला आहे. हे जाणून आश्चर्य वाटेल की लीगच्या टप्प्यात त्रिनबॅगोच्या संघाने त्यांचे सर्व सामने जिंकले आहेत.
त्रिनबॅगो नाइट रायडर्सने “डबल राउंड रॉबिन” फॉर्मेटनुसार सर्व संघांना दोनदा पराभूत केले आहे. यावेळी सीपीएलमध्ये एकूण ६ संघांनी सहभाग घेतला आहे.
नाईट रायडर्सने १० सामने जिंकत २० गुणांसह, अव्वल स्थान मिळविले आहे. नाईट रायडर्सनंतर दोन नंबरला गयाना अमेझॉन वॉरियर्स आहे, ज्यांनी १० पैकी ६ सामने जिंकले आहेत, तर ४ सामन्यांत संघाने पराभव पत्करला आहे.
सेंट लुसिया झुक्सनेही १० पैकी ६ विजय मिळवून उपांत्य फेरी गाठली आहे. त्याशिवाय चौथा संघ जमैका तलावाह्ज असून त्यांनी १० पैकी केवळ 3 सामने जिंकले आहेत. जमैकन संघाचा एक सामना पावसामुळे रद्द झाला होता.
सीपीएल २०२० उपांत्य फेरीसाठी पात्र ठरलेला नाईट रायडर्स ८ सप्टेंबरला पहिल्या उपांत्य सामन्यात जमैकाशी भिडणार आहे. हा सामना त्रिनिदादमधील ब्रायन लारा स्टेडियमवर खेळला जाईल.
त्याचबरोबर दुसरा उपांत्य सामना गयाना अमेझॉन वॉरियर्स विरुद्ध सेंट लुसिया झुक्स यांच्यात ८ सप्टेंबर रोजी त्याच मैदानावर दुसर्या शिफ्टमध्ये खेळला जाणार आहे. त्याचबरोबर स्पर्धेचा अंतिम सामना १० सप्टेंबर रोजी ब्रायन लारा स्टेडियममध्ये खेळला जाईल.
महत्त्वाच्या बातम्या-
-केकेआरचा हा खेळाडू ठोकू शकतो आयपीएलमध्ये द्विशतक, पहा कोणी केलाय हा दावा
-कोरोनामुळे क्रिकेटरवर आली वाईट वेळ, चेंडू सापडायला गेला अन्…
-टीममधील एक सदस्य सापडला कोरोना पाॅझिटीव्ह, अर्ध्यातच सोडावा लागला क्रिकेटचा सामना
ट्रेंडिंग लेख-
-आयपीएलचे सितारे : पंजाबला विजेतेपद मिळवून देण्यास आतुर असलेला ‘गॅंग्स ऑफ कर्नाटक’ जगदीशा सुचिथ
-भारतीय संघाकडून वनडेत खेळलेले ४ खेळाडू, जे फारसे कुणाला माहीत नाही
-टीम इंडियात हक्काची जागा न मिळालेला विदर्भाचा धडाकेबाज ढाण्या वाघ