न्यूझीलंड आणि पाकिस्तान संघातील ३ सामन्यांच्या टी२० मालिकेला १८ डिसेंबरपासून सुरुवात झाली आहे. यातील दुसरा सामना रविवारी (२० डिसेंबर) सेडन पार्क, हॅमिल्टन येथे झाला. हा सामना न्यूझीलंडने ९ विकेट्सने जिंकला. असे असले, तरीही या सामन्यात पाकिस्तान संघाचा ४० वर्षीय धडाकेबाज अष्टपैलू खेळाडू मोहम्मद हाफीजने आपल्या टी२० कारकिर्दीतील सर्वोत्तम फलंदाजी प्रदर्शन केले.
मोहम्मद हाफीजने ठोकल्या नाबाद ९९ धावा
या सामन्यात नाणेफेक जिंकून पाकिस्तान संघाने फलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी त्यांनी ६ विकेट्स गमावत १६३ धावा केल्या. यामध्ये पाकिस्तानकडून खेळताना मोहम्मद हाफीजने जबरदस्त खेळी करत सर्वाधिक नाबाद ९९ धावा केल्या. ही खेळी त्याने ५७ चेंडूचा सामना करताना ५ षटकार आणि १० चौकारांच्या मदतीने केली. यासह त्याने आपल्या टी२० कारकिर्दीतील सर्वोत्तम फलंदाजी प्रदर्शन केले.
Mohammad Hafeez slams the highest T20I score of his career — 9️⃣9️⃣* off 57 balls 😱
🇵🇰 Pakistan finish on 163/6 👌
Can they defend the total to level the series? #NZvPAK pic.twitter.com/EGj67joagi
— ICC (@ICC) December 20, 2020
यापूर्वी सप्टेंबरमध्ये केल्या होत्या टी२०त सर्वाधिक धावा
यापूर्वी त्याची टी२० क्रिकेटमधील सर्वोत्तम धावसंख्या ही नाबाद ८६ इतकी होती. त्याने मँचेस्टर येथे सप्टेंबर २०२० मध्ये इंग्लंडविरुद्ध खेळलेल्या टी२० सामन्यात ही खेळी केली होती. यामध्ये ४ चौकार आणि ६ षटकारांचा समावेश होता.
हाफीजव्यतिरिक्त मोहम्मद रिझवान याने २२ धावांची खेळी केली. तसेच खुशदील शाह (१४) आणि इमाद वसीम याने (१०) धावांची खेळी केली. त्यांच्याव्यतिरिक्त एकाही फलंदाजाला १० किंवा त्यापेक्षा अधिक धावसंघ्या करता आली नाही.
टीम साऊदीने घेतल्या सर्वाधिक विकेट्स
न्यूझीलंड संघाकडून गोलंदाजी करताना टीम साऊदीने सर्वाधिक विकेट्स घेतल्या. त्याने ४ षटके गोलंदाजी करताना २१ धावा देत ४ विकेट्स घेतल्या. त्याच्याव्यतिरिक्त जेम्स नीशम आणि इश सोधी यांनी प्रत्येकी एक विकेट आपल्या नावे केली.
न्यूझीलंडकडून केन विलियम्सन आणि टीम सेफर्टने ठोकले अर्धशतक
पाकिस्तानने दिलेले आव्हान न्यूझीलंडने १ विकेट गमावत पूर्ण केले. यामध्ये टीम सेफर्टने सर्वाधिक धावा केल्या. त्याने ६३ चेंडूत नाबाद ८४ धावांची अफलातून खेळी केली. यामध्ये ३ षटकार आणि ८ चौकारांचा समावेश आहे. सोबतच केन विलियम्सननेही ५७ धावांची अर्धशतकी खेळी केली. या दोघांच्या खेळीने न्यूझीलंडला विजय मिळवून दिला.
हाफीजची टी२० क्रिकेटमधील कामगिरी
हाफीजने पाकिस्तान क्रिकेटकडून खेळताना ९७ टी२० सामने खेळले. यामध्ये त्याने २६.६२ च्या सरासरीने २१८३ धावा केल्या आहेत. यात त्याने १३ अर्धशतके ठोकली आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
कसोटीत ५ शतके ठोकणारा ‘तो’ खेळणार दुसरा कसोटी सामना?, मोहम्मद कैफचा जबरदस्त तोडगा
‘बॉक्सिंग डे’ कसोटी सामन्यात भारतीय संघ उतरणार नव्या जोशात, होऊ शकतात ‘हे’ ५ बदल
भारताविरुद्ध कसोटीत एका डावात ५ विकेट्स घेणाऱ्या जोश हेजलवूडने उलगडला आपला ‘गेम प्लॅन’
ट्रेंडिंग लेख-
‘या’ तीन दिग्गज खेळाडूंची मुले, भविष्यात करू शकतात भारतीय संघाचे प्रतिनिधित्त्व
भारतीय संघाचे ६ धडाकेबाज खेळाडू, ज्यांनी २०२० मध्ये केले क्रिकेटला ‘बाय बाय’
‘बॉक्सिंग डे’ कसोटी सामन्यात भारतीय संघ उतरणार नव्या जोशात, होऊ शकतात ‘हे’ ५ बदल