क्रिकेट खेळात सध्या अनेक विक्रम होत आहेत. आजही असाच एक मोठा इतिहास वनडे क्रिकेटमध्ये रचला गेला आहे. या इतिहासाचे साक्षीदार पापुआ न्यू गिनी आणि हॉंगकॉंग हे दोन संघ ठरले आहेत.
आज हरारेमध्ये पापुआ न्यू गिनी विरुद्ध हॉंगकॉंग संघात विश्वचषक पात्रता फेरीतील सामना सुरु आहे. हा सामना वनडे क्रिकेटमधील ४००० वा सामना आहे. त्यामुळे क्रिकेट इतिहासात वनडे क्रिकेटने आज मोठा टप्पा पार केला आहे.
क्रिकेट इतिहासातील पहिला वनडे सामना ५ जानेवारी १९७१ साली ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड संघात मेलबर्नला खेळला गेला होता. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला होता.
वनडे क्रिकेटने गेल्या ४७ वर्षात बरेच यश संपादन केले आहे. मर्यादित षटकांच्या या क्रिकेट प्रकाराने खेळाला गती प्राप्त करून दिली.
वनडे क्रिकेटमधील महत्वाचे टप्पे:
पहिला वनडे सामना: ५ जानेवारी १९७१ – ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड
१००० वा वनडे सामना: २४ मे १९९५ – इंग्लंड विरुद्ध विंडीज
२००० वा वनडे सामना: १० एप्रिल २००३ – पाकिस्तान विरुद्ध झिम्बाब्वे
३०००वा वनडे सामना: २२ जून २०१० – इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया
४००० वा वनडे सामना: १७ मार्च २०१८ – पापुआ न्यू गिनी विरुद्ध हॉंगकॉंग