---Advertisement---

बीडला ४६ वी कुमार-कुमारी गट राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धा.

On: शुक्रवार, जानेवारी 17, 2020 4:21 PM
---Advertisement---

महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने बीड जिल्हा कबड्डी असोसिएशन व कै. हेमंत राजमाने बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, अंबेजोगाई यांच्यासंयुक्त विद्यमाने ४६ वी कुमार-कुमारी गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धाचा आयोजन करण्यात आलं आहे.

योगेश्वरी महाविद्यालय, अंबाजोगाई, परळी रोड ता. अंबाजोगाई, जी. बीड येथे दिनांक १ फेब्रुवारी २०२० ते ४ फेब्रुवारी २०२० या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे.

सदर स्पर्धेत महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनला संलग्न असलेल्या जिल्ह्याचे संघ सहभागी होणार आहेत. जवळपास कुमार गटाचे २५ तर कुमारी गटाचे २५ संघ सहभागी होणार आहेत. स्पर्धेसाठी मातीची ६ मैदाने तयार करण्यात येणार असून कबड्डी रसिकांसाठी बसण्यासाठी भव्य प्रेक्षक गॅलरी उभारण्यात येणार आहे.

सदर स्पर्धेतून महाराष्ट्र कुमार-कुमारी गटाचा प्रतिनिधीक २०-२० खेळाडूंचा संघ निवडला जाईल. नंतर त्यातून महाराष्ट्राचे संघ निवडले जातील. सदर निवडलेल्या संघ ४६ व्या कुमार-कुमारी गट राष्ट्रीय अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतील.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---